S M L

समीर भुजबळांना जामीन नाहीच!

पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी सुधारणा केली गेली असल्यानं समीर यांना जामीन देता येणार नाही असं ईडीनं कोर्टाला सांगितलं.

Sachin Salve | Updated On: May 21, 2018 06:26 PM IST

समीर भुजबळांना जामीन नाहीच!

 

मुंबई, 21 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाहीये. समीर यांच्या जामीन अर्जावर हायकोर्ट आता गुरुवारी सुनावणी घेणार आहे. दरम्यान ईडीनं समीर यांच्या जामिनाला विरोध केला आहे.

पीएमएलए कायद्यात २९ मार्च रोजी सुधारणा केली गेली असल्यानं समीर यांना जामीन देता येणार नाही असं ईडीनं कोर्टाला सांगितलं. या कायद्यातील कलम ४५ हे घटनात्मक दृष्ट्या अवैध असल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्याचा आधार जामीन अर्ज केला होता. त्यांचा अर्ज कोर्टाने मंजूर करत ४ मे रोजी जामीन मंजूर केला.

मात्र, त्याच धर्तीवर समीर यांनी कायद्यातील बदलामुळे जामीन देता येणार नाही असा युक्तीवाद ईडीनं केला. पण हा युक्तीवाद छगन भुजबळ यांच्या जामिनावेळी का केला नाही असा सवाल कोर्टाने ईडीला विचारला.

त्यावेळेस आपल्याला याची माहिती नव्हती असं ईडी म्हटलं त्यावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त करत आणि पुढील सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2018 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close