मुंडे बहिणींना जेव्हा गरज असेल तेव्हा मी त्यांच्या पाठीशी - संभाजीराजे छत्रपती

मुंडे बहिणींना जेव्हा गरज असेल तेव्हा मी त्यांच्या पाठीशी - संभाजीराजे छत्रपती

'स्वर्गीय मुंडे साहेबांची भेट झाली तेव्हा त्यानी सांगितलं होतं की माझ्या मुलीकडे लक्ष द्या. म्हणून, आज प्रीतम मुंडेना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.'

  • Share this:

बीड, 16 एप्रिल : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज परळीत प्रीतम मुंडे यांची भेट घेतली. यावेळी आपण कायम त्यांच्या पाठीशी असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. 'मुंडे घरानं आणि आमच्या घराण्याचे जुने संबंध आहेत. म्हणून खास शुभेच्छा देण्यासाठी परळीला आलो. बहुजन समजाला एकत्रित करण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी आम्ही शिव शाहू दौरा काढून महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्यानंतर खासदार मुंडे साहेबांनी. मला भगवान गडावर बोलवून घेतल होतं. त्यावेळी शिवछत्रपतींच्या विचाराने चालताना जाती-पातीपेक्षा बहुजन समाज एकत्रित करण्यसाठी आम्ही प्रयत्न केला.' असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

'स्वर्गीय मुंडे साहेबांची भेट झाली तेव्हा त्यानी सांगितलं होतं की माझ्या मुलीकडे लक्ष द्या. म्हणून, आज प्रीतम मुंडेना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.' असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. 'ज्या ज्या वेळी मुंडे बहिणींना गरज असेल त्यावेळी मी ठामपणे पाठीशी असेल' असेही खासदार संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.

संभाजीराजे छत्रपती यांनी आज परळीत प्रीतम मुंडेची भेट घेतली. यावेळी निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली आहे. व्हाट्सअप आणि इतर साधनांमुळे चुकीचे मेसेज फिरत आहेत. यातच निवडणुकीत जातीचं येणं हे चुकीचं आहे.  असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

छत्रपतीनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. मराठा असण्याचा मला अभिमान आहे. मी मराठ्यांचं नेतृत्व करतो. पण त्याहीपेक्षा जास्त बहुजनांचे नेतृत्व करतो. त्यामुळे जातीपेक्षा विकासावर मतदान व्हावं.' असंही संभाजीराजे म्हणाले.

हेही पाहा: VIDEO : उद्धव ठाकरेंची शरद पवारांवर टीका, म्हणाले...

ते पुढे म्हणाले की, 'जातीचं राजकारण केल्यावर वाईट वाटतं. जातीपातीच्या राजकारणापलीकडे आपण विकासाबाबतीत विचार केला पाहिजे. बहुजन समाज एकत्रित नांदण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं जातीपातीचं राजकारण होऊ नये म्हणून माझी संपूर्ण बीडकरांना विनंती आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत.' असे म्हणतं संभाजी राजेंनी आवाहन केलं.

मोदी सरकारवर उदयनराजे भोसले टीका करतात असा प्रश्न विचारल्यावर 'ते माझे बंधू आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. प्रत्येकाला लोकशाहीत कुठे जायचं याचं स्वातंत्र्य आहे. तसंच प्रीतम मुंडे संदर्भात उदयन राजेंचं प्रेम आहे. त्यामूळे त्यांची भूमिका स्पष्ट आहे. तसंच माझ्या मते देशाला चांगल्या पंतप्रधानाची गरज आहे. मोदी पंतप्रधान झाले तर आनंदच आहे. ते व्हायला पाहिजेत' असं मतं त्यानी व्यक्त केलं.

VIDEO : 'खल्लास गर्ल' भाजप उमेदवाराच्या प्रचार रॅलीत सहभागी

First published: April 16, 2019, 5:39 PM IST

ताज्या बातम्या