'तानाजी' चित्रपटाला संभाजी ब्रिगेडचा विरोध, 'या' दृश्यांबद्दल मागितला खुलासा

'तानाजी' चित्रपटाला संभाजी ब्रिगेडचा विरोध, 'या' दृश्यांबद्दल मागितला खुलासा

लेखक आणि दिग्दर्शक आणि निर्मिता यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास न करता अशा प्रकारे चित्रपट बनवला आहे.

  • Share this:

पुणे, 19 नोव्हेंबर : बॉलिवूडचा अभिनेता अजय देवगण याने आता तानाजी मालुसरे यांच्या जीवानावर 'तानाजी' हा चित्रपट साकारला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आजच लाँच झाला आहे. परंतु, संभाजी ब्रिगेडने तानाजी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

लेखक आणि दिग्दर्शक आणि निर्मिता यांनी इतिहासाचा सखोल अभ्यास न करता अशा प्रकारे चित्रपट बनवला आहे. ज्यामुळे शिवरायांच्या प्रेमीमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. जर तानाजी या चित्रपटातील वादग्रस्त प्रंसग आणि संवाद वगळले नाही तर चिञपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा संभाजी बिग्रेडने दिला आहे.

तानाजी चिञपटातील संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

१) छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण दाखवला आहे? चिञपटाद्वारे रामदासाचे उदात्तीकरण केले गेले असेल तर चिञपटाचे निर्माते - दिर्ग्दशक यांना याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

२) अभिनेञी काजोल यांच्या तोंडी जे संवाद आहेत. त्यावरुन छञपती शिवरायांची अनऐतिहासिक अशी गो-ब्राम्हणप्रतिपालक ही उपाधी परत जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हे सरळ सरळ इतिहासाचे विकृतीकरण आहे.

३) छञपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर ॐ दाखवून, छञपती शिवरायांची सर्वधर्म समावेशक प्रतिमा पुसून छञपतींचे हिंदुपतपादशाह अशी धार्मिक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

या आणि चिञपटातील अन्य आक्षेपार्ह दृष्याबाबत आम्ही निर्माते आणि दिर्ग्दशक यांच्याकडून खुलासा मागवत आहोत. ऐतिहासिक विषयावर चिञपट जरुर निघाले पाहिजेत. परंतु,त्याद्वारे ऐतिहासिक प्रसंगाचे वा व्यक्तींचे ब्राम्हणीकरण,विकृतीकरण कुठल्याही परिस्थितीमध्ये खपवून घेतले जाणार नाही, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी स्पष्ट केलं.

असा आहे 'तानाजी'चा ट्रेलर

काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा फर्स्ट लुक समोर आला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

शिवाजी महाराजांनी जिवाचं रान करुन अवघं स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्याच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसलाय. तर सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.

तानाजी नावावरून दुरस्ती

'तानाजी-द अनसंग वॉरियर' (Tanhaji : The Unsung Warrior) मागच्या काही काळापासून खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या नावाच्या स्पेलिंगमुळे वादाची चिन्ह होती. पण खुद्द तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनीच या दिल्यानं या वादावर सुरू होण्याआधीच पडदा पडला.

अजय देवगणचा 100 वा चित्रपट

हा सिनेमा अजयसाठी खूप महत्त्वाचा तर आहेच पण काही कारणानं खूप खासही आहे. कारण हा सिनेमा त्याचा बॉलिवूडमधील 100 वा सिनेमा आहे. याशिवाय या सिनेमातून काजोल-अजयची जोडी तब्बल 12 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या सिनेमात काजोल तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

============================================

Published by: sachin Salve
First published: November 19, 2019, 9:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading