Home /News /news /

संभाजी भिडे गुरूजींनी भीमा कोरेगावच्या दंगलीचे आरोप फेटाळले

संभाजी भिडे गुरूजींनी भीमा कोरेगावच्या दंगलीचे आरोप फेटाळले

कोरेगाव भीमा दंगली प्रकरणातले आमच्यावर झालेले आरोप निराधार असून आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, अशा शब्दात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. आम्ही आयुष्यात कधीही आगलावेपणा केला नाही, असंही भिडे गुरूजींनी म्हटलंय.

पुढे वाचा ...
05 जानेवारी सांगली : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणातले आमच्यावर झालेले आरोप निराधार असून आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत, अशा शब्दात शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. आम्ही आयुष्यात कधीही आगलावेपणा केला नाही, असंही भिडे गुरूजींनी म्हटलंय. ते सांगलीत बोलत होते. भिडे आणि एकबोटे यांच्याविरोधात वढू बुद्रुकमधील ग्रामस्थांमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. त्यावर भिडे गुरुजींनी एका गटाकडून अॅट्रॉसिटीचा घाणेरड्या राजकारणासाठी सातत्याने गैरवापर होत आल्याचा गंभीर आरोप केलाय. संभाजी भिडे गुरूजी पुढे म्हणाले, ''आजच्या लोकशाहीत मिळेल ती गोष्ट राजकारणा साठी वापरायची अशी राजकारण्यांना सवय लागली आहे. राजकीय नेते हे पवित्र गोष्टीचा चोथा करून खातात. तसंच एट्रोसिटीचा एकुणच घाण वापर होतोय अशी टीका शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरूजींनी केली.एट्रोसिटी असावी का नको हे मला माहित नाही, पण लोकशाहीचा खून करण्याचा अधिकार एट्रोसिटीच्या माध्यमातून एका गटाला आणि जमावाला दिला आहे. तसंच काही नेते माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा डाव करत आहेत असाही आरोप भिडे गुरूजींनी केला. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.''
First published:

Tags: Autrocity, Bhima koregoan, Riot, Sambahaji bhide, दंगलीचे आरोप, भीमा कोरेगाव, संभाजी भिडे

पुढील बातम्या