Home /News /news /

भिडे गुरूजींचं मुंबईतलं व्याख्यान पोलिसांच्या विनंतीवरून पुढे ढकललं !

भिडे गुरूजींचं मुंबईतलं व्याख्यान पोलिसांच्या विनंतीवरून पुढे ढकललं !

कोरेगाव भीमा दंगल वादाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर पोलिसांच्या विनंतीवरूनच आम्ही हे नियोजित व्याख्यान पुढे ढकलत आहोत, असा खुलासा संयोजकांनी केलाय.

05 जानेवारी, मुंबई : कोरेगाव भीमा दंगल वादाच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मुंबईतील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. तर पोलिसांच्या विनंतीवरूनच आम्ही हे नियोजित व्याख्यान पुढे ढकलत आहोत, असा खुलासा संयोजकांनी केलाय. मुंबईतील लालबाग येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भिडे गुरुजींचं 7 जानेवारीला म्हणजे येत्या रविवारी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गेल्या एक महिन्यापासून या व्याख्यानाची तयारी केली जात होती. जवळपास 5 हजार लोक उपस्थित राहतील, अशी व्यवस्थाही इथे करण्यात आली होती. "कोरेगाव-भीमा हिंसाचार झाल्यानंतर, त्यात भिडे गुरुजींचं नाव गोवण्यात आले. त्यामुळे जातीयवादी वाद-विवाद, तसेच दंगल होऊ नये म्हणून व्याख्यान पुढे ढकलण्याची भूमिका घेतली आहोत.", असे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बलवंत दळवी यांनी सांगितले. कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी भिडे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. स्वतः भिडे गुरूजींनी मात्र, हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.
First published:

Tags: Mumbai sabha, Sambhaji bhide, भिडे गुरूजी, मुंबई पोलीस, व्याख्यान रद्द, संभाजी भिडे

पुढील बातम्या