यंत्रणेस डुलकी लागली की सामान्य जनतेची झोप उडणारच, शिवसेनेचा हल्लाबोल

यंत्रणेस डुलकी लागली की सामान्य जनतेची झोप उडणारच, शिवसेनेचा हल्लाबोल

  • Share this:

15 मे : यंत्रणेस डुलकी लागली की सामान्य जनतेची झोप ही उडणारच!,   सरकार आणि त्यांची यंत्रणा बेफिकीर असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. मुंबईतून 26 पाकिस्तानी गायब झाल्याच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेने सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांनी 26 पाकिस्तानी भारतातून गायब झाल्याच्या मुद्द्यावरून केंद्रसरकारला खडेबोल सुनावलं आहेत. पाकिस्तानी व्हिसा घेऊन या 26 जणांचं भारतात रितसर आगमन झालं. ते किती दिवस थांबणार आणि कुठे थांबणार याची चौकशी करण्यात आली नाही. आता अचानक आमच्या यंत्रणांना जाग आली आणि हे लोक गायब झाल्याचे लक्षात आलं. म्हणजे फक्त पाकिस्तानच्या सीमेवरच आपण मार खात आहोत असं नाही तर अगदी देशांतर्गत सुरक्षेच्या बाबतीतही माती खाण्याचे प्रकार सुरू आहेत, असा घणाघातच उद्धव यांनी केला आहे.

First published: May 15, 2017, 11:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading