काय म्हणाव या नौटंकीला; गांधीजींच्या पुतळ्या समोर नेता रडला ढसाढसा!

काय म्हणाव या नौटंकीला; गांधीजींच्या पुतळ्या समोर नेता रडला ढसाढसा!

गांधीजींच्या नावाने राजकारण करणाऱ्या एका नेत्याने चक्क त्यांच्या पुतळ्यासमोर रडण्याची नौटंकी केली.

  • Share this:

सम्भल, 03 ऑक्टोबर: काल 02 ऑक्टोबर रोजी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी झाली. या निमित्ताने विविध लोकांनी गांधीजींबद्दल आदर व्यक्त केला. अर्थात यात राजकीय नेते मंडळी मागे नव्हती. गाधीजींच्या नावाचा वापर सत्तेसाठी किंवा सत्तेच्या फायद्यासाठी करणार नाहीत ते नेते कसे असाच काहीसा अनुभव यावेळी गांधी जयंती निमित्त आला. गांधीजींच्या नावाने राजकारण करणाऱ्या एका नेत्याने चक्क त्यांच्या पुतळ्यासमोर रडण्याची नौटंकी केली. या नौटंकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गांधीजींच्या जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एक सर्वसाधारण कार्यक्रम म्हणजे गांधीजींच्या पुतळ्याला हार घालण्याचा होय. उत्तर प्रदेशमधील संम्भल येथील समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष फिरोज खान यांनी गांधीजींच्या पुतळ्याला हार घातला. त्यानंतर कॅमेरा बघतात त्यांनी रडण्यास सुरुवात केली. रडत रडतच त्यांनी गांधीची तुम्ही कुठे गेला, आम्हाला असे सोडून वैगरे नौटंकी भाषण करण्यास सुरुवात केली. एका बाजूला फिरोज खान रडत होते तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या मागे उभे असलेले कार्यकर्ते ही ड्रामेबाजी बघून हसत होते.

फिरोज खान यांचा हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आदित्य जयराम तिवारी नावाच्या एका पत्रकारने ट्विटवर शेअर केला आहे. तिवारी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेक युझर्सनी खान यांना ट्रोल केले आहे. एका युझरने खान यांची ही नौटंकी भारताकडून ऑस्करसाठी पाठवावी असे म्हटले आहे. व्हिडिओत खान यांच्या जवळ उभा असलेला एक कार्यकर्ता जो त्यांच्या या नौटंकीत सहभागी झाला आहे. त्याला सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेताचा पुरस्कार द्यावा असे देखील युझर्सनी म्हटले आहे.

काय म्हणाले फिरोज खान

गाधीजींच्या पुतळ्यासमोर उभे राहून रडण्याची नौटंकी करत खान म्हणाले, बापू, देशाला स्वातंत्र्य मिळवून देऊन; आम्हाला अनाथ करून तुम्ही कुठे गेला. इतक्या मोठ्या देशाला तुम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले. पण आमच्या सर्व इच्छा संपत चालल्या आहेत. बापू तुम्ही कुठे गेला. देशासाठी इतक मोठ योगदान देऊन तुम्ही कुठे गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2019 10:31 AM IST

ताज्या बातम्या