'मला रोज 18 लोकांसोबत सेक्स करावं लागायचं आणि ते विसरण्यासाठी कोकेन द्यायचे'

'मला रोज 18 लोकांसोबत सेक्स करावं लागायचं आणि ते विसरण्यासाठी कोकेन द्यायचे'

'स्लेव गर्ल' अशा नावाने साराने त्यांची आत्मकथा लिहली आहे. त्यात त्यांनी हे भयानक आणि धक्कादायक अनुभव लिहले आहे.

  • Share this:

नेदरलँड, 08 जानेवारी :  19 वर्षाची युवती नर्सची नोकरी करण्यासाठी एम्सटर्डमला गेली होती. पण तिथे एअरपोर्टच्या बाहेर येताच तिचा पासपोर्ट चोरी करण्यात आला आणि तिथेच या धक्कादायक कहानीची सुरुवात झाली.

पासपोर्ट चोरल्यानंतर या तरुणीला 18 पुरुषांकडून सेक्ससाठी जबरदस्ती करण्यात आली. ही कहानी ब्रिटनच्या साराची आहे. त्या आता 42 वर्षांच्या आहेत. 'स्लेव गर्ल' अशा नावाने साराने त्यांची आत्मकथा लिहली आहे. त्यात त्यांनी हे भयानक आणि धक्कादायक अनुभव लिहले आहे.

सारा या नोकरीची जाहिरात पाहून एम्सटर्डमला गेल्या होत्या. ती जाहिरात एका ब्रिटिश गुन्हेगार जॉन रीसीने प्रकाशित केली होती. जॉनने खोटी जाहिरात दाखवून हा सापळा रचला असल्याचं सारा म्हणतात. 'मी आजही त्याला माझ्या स्वप्नात पाहते' असं साराने त्यांच्या आत्मकथेमध्ये लिहलं आहे.

एअरपोर्टवर जाताच सारा जॉनला भेटल्या आणि त्याने बंदूकीच्या धाकावर त्यांना पळवून नेलं. सगळ्यात धक्कादायक म्हणजे त्यांना धकम्या देऊन वेश्या वस्तीत नेलं आणि 20-20 लोकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली.

हेही वाचा - आत्महत्येचा असा प्रकार तुम्ही कधी पाहिला नसेल, ट्रकच्या केबिनला लटकून संपवलं जीवन

'मला रोज 18 लोकांसोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली जायची', असं धक्कादायक वास्तव सारा यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये मांडलं आहे. 'झालेल्या गोष्टी मी विसरून जावं यासाठी मला कोकेन देण्यात येतं' असल्याचंही सारा यांनी म्हटलं आहे.

1997मध्ये सारा या मानवी तस्करी करणाऱ्या टोळीच्या तावडीतून सुटल्या. त्यावेळी त्यांना बेल्जियमच्या एका सुरक्षित ठिकाणी गेल्या. खूप वर्षांनी सारा त्यांच्या आईला भेटल्या होत्या.

या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी अपहरण आणि अत्याचार करणाऱ्यांविरोधात पुरावे पोलिसांच्या हाती दिले आणि यात पोलिसांनी 5 लोकांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकाराला आता खूप वर्ष उलटून गेली पण, 'आजही माझ्या स्वप्नात मी जॉनला पाहते' असं सारा म्हणतात. त्यांच्या डोळ्यांत आजही तेच भयानक वास्तव दिसत अशी त्यांची आई म्हणते.

कितीही कठोर असला तरी हा VIDEO पाहिल्यावर तुमचं काळीज पाझरल्याशिवाय राहणार नाही!

First published: January 8, 2019, 12:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading