मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एका फतव्याने सलमान रश्दींचे आयुष्य कसं बदललं? भाषांतर करणाऱ्यांचेही खून, 33 वर्षांचा संघर्ष

एका फतव्याने सलमान रश्दींचे आयुष्य कसं बदललं? भाषांतर करणाऱ्यांचेही खून, 33 वर्षांचा संघर्ष

इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या 1988 मधील द सॅटॅनिक व्हर्सेस या कादंबरीसाठी मृत्यूदंडाचा फतवा जारी केला होता. फतवा जारी केल्यानंतर तेहतीस वर्षांनी सलमान रश्दी यांच्यावर शुक्रवारी चाकूने निर्घृण हल्ला करण्यात आला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी सलमान रश्दी यांच्या 1988 मधील 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या कादंबरीसाठी मृत्यूदंडाचा फतवा जारी केला होता. या फतव्यानंतर 33 वर्षांनंतर शुक्रवारी सलमान रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. लेखक रश्दी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवर असल्याचे त्यांच्या एजंटने सांगितले होते. चाकूच्या हल्ल्यात त्याचा एक डोळा आणि यकृताला गंभीर इजा झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. फतव्यामध्ये खोमेनी यांनी जगातील मुस्लिमांना 'द सॅटॅनिक व्हर्सेस' या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशकांना त्वरीत शोधून काढण्याचे आवाहन केले होते, जेणेकरुन भविष्यात इस्लामच्या पवित्र मूल्यांना धक्का लावण्याचे धाडस कोणी करू नये. रश्दींच्या डोक्यावर 28 लाख डॉलर्सचे इनाम ठेवण्यात आले होते. रश्दींच्या खुनाचा प्रयत्न करताना कोणी मारले गेले तर त्याला शहीद समजावे आणि त्याला स्वर्ग मिळेल असे खोमेनी म्हणाले होते. या फतव्याने रश्दींचे आयुष्य कायमचेच बदलून गेले. पुढील 13 वर्षांत, रश्दींनी जोसेफ अँटोन हे टोपणनाव धारण केले आणि पहिल्या 6 महिन्यांत 56 वेळा घरे बदलली. प्रसिद्ध लेखक सलमान रुश्दी यांच्यावर हल्ला करणारा संशयित अटकेत मात्र, या फतव्याचे केवळ रश्दीच बळी नाही. 'द सॅटॅनिक व्हर्सेस'चे जपानी भाषेत भाषांतर करणाऱ्या हितोशी इगाराशी यांची 1999 मध्ये टोकियोच्या ईशान्येकडील सुकुबा युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील एका इमारतीत वार करून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या शरीरावर चाकूच्या खोल जखमा असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. द सॅटॅनिक व्हर्सेसचे इटालियनमध्ये भाषांतर करणार्‍या एटोर कॅप्रिओलो यांच्यावर देखील त्यांच्या मिलान अपार्टमेंटमध्ये हल्ला करण्यात आला. तो या हल्ल्यातून वाचला, तर ऑक्टोबर 1993 मध्ये, कादंबरीचे नॉर्वेजियन प्रकाशक विल्यम नायगार्ड यांना तीन वेळा गोळ्या घालण्यात आल्या. नायगार्ड याला त्याच्या ओस्लो येथील घराबाहेर मेला म्हणून सोडलं. बरे होण्यासाठी त्यांना अनेक महिने रुग्णालयात काढावे लागले. तर 1998 मध्ये ब्रिटनशी राजनैतिक संबंध सुधारण्याच्या प्रयत्नादरम्यान, इराणचे नेते मोहम्मद खतामी म्हणाले की इराणने रश्दी यांच्या हत्येच्या कोणत्याही प्रयत्नांना पाठिंबा दिला नाही किंवा अडथळा आणणार नाही. जवळपास एक दशकानंतर, इराणच्या राज्य वृत्तसंस्थेने सांगितले की फतवा अद्याप लागू आहे आणि रश्दीच्या हत्येसाठी बक्षीस 30 लाखपेक्षा जास्त डॉलरचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
First published:

पुढील बातम्या