मुंबई, 29 मे- एकीकडे शिखर धवन वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्याची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे. शिखर धवनची बॅट तळपली तर भारताला विजयापासून कोणीच रोखू शकत नाही. सध्या शिखर इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपची तयारी करत असला तरी बी- टाउनमध्ये सध्या त्याच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे.
अक्षय कुमारच्या आगामी 'हाउसफुल ४' सिनेमात तो दिसणार आहे. या सिनेमात अक्षयसोबत बॉबी देओल, रितेश देशमुख, क्रिती सेनन, क्रिती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आता या दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत शिखरचं नाव जोडलं गेलं आहे. या सिनेमात शिखर छोटेखानी भूमिका साकारताना दिसणार आहे. सलमान खान, विद्या बालनसोबत तो पाहुणा कलाकार म्हणून सिनेमात दिसणार आहे.
Finally मलायका- अर्जुनने मान्य केलं त्यांचं नातं, नात्याबद्दल तो म्हणाला...
View this post on Instagram
तगड्या मानधनसाठी 'या' 5 स्टार्सनी नाकारले सिनेमे
भारतीय क्रिकेटरांचं बॉलिवूड प्रेम काही नवं नाही. क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं एकमेकांशी फार जुनं नातं आहे. शिखरच्याआधी अनेक क्रिकेटरांनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावलं आहे. सुनील गावस्कर, अजय जडेजा, नवज्योत सिंग सिद्धू, विनोद कांबळी यांनी याआधी सिनेमांत काम केलं आहे. यांच्या पावलांवर पाऊल ठेवत शिखरही सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे. आता त्याच्या बॅटप्रमाणेच अभिनयातही उजवा ठरतो का ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
रेड बिकीनीमध्ये पुन्हा एकदा दिसला मलायकाचा HOT अंदाज, PHOTO VIRAL
शिखर धवनने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आतापर्यंत ३४ कसोटी सामने, १२७ एकदिवसीय सामने आणि ५० टी२० सामने खेळले. ३४ कसोटी सामन्यंच्यात त्याने भारतासाठी ४०.६१ च्या सरासरीने २३१५ धावा केल्या.तर १२७ एकदिवसीय सामन्यांत ४४.९० च्या सरासरीने ५३४३ धावा केल्या. टी२०मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने २८.४८ च्या सरासरीने १३१० धआवा केल्या. शिखरने आतापर्यंत कसोटी सामन्यात सातवेळा तर एकदिवसीय सामन्यात १६ वेळा शतकी खेळी खेळली आहे.
SPECIAL REPORT : दहावीपेक्षा बारावीचे मार्क भरपूर, पाहा आर्चीचं रिपोर्टकार्ड