लॉकडाऊनमुळे अडकला सलमान खान, भाचाच्या अंत्यविधीला जाता न आल्यामुळे दु: खी

लॉकडाऊनमुळे अडकला सलमान खान, भाचाच्या अंत्यविधीला जाता न आल्यामुळे दु: खी

भाचा अब्दुल्लाच्या अंत्यसंस्कारात भाग घेण्यास अपयशी ठरल्यामुळे सलमान दु: खी झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 01 एप्रिल : सलमान खानचा भाचा अब्दुल्ला खान याचे निधन झाले आहे, त्यानंतर सलमान खान बराच डिस्टर्ब झाला आहे. अब्दुल्ला खान याचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सलमान खानने सोशल मीडियावर ही माहिती दिली. भाचा अब्दुल्लाच्या अंत्यसंस्कारात भाग घेण्यास अपयशी ठरल्यामुळे सलमान दु: खी झाला आहे. कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे तो त्याच्या अंत्यसंस्कारात जाऊ शकला नाही.

बॉम्बे टाईम्सच्या वृत्तानुसार, सलमान खान पनवेल फार्महाऊसमध्ये कुटुंबासमवेत आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो पनवेल फार्महाऊसमध्ये संपूर्ण कुटूंबासह वेगळा राहण्यासाठी गेला. अचानक त्याच्या भाचाच्या मृत्यूची बातमी कळाली. देशातील लॉकडाऊनमुळे तो अंत्यदर्शनापर्यंत पोहोचू शकला नाही, ज्यामुळे तो खूप दु: खी आहे. अब्दुल्ला याचे इंदूरमध्ये निधन झाले आहे. अशा परिस्थितीत सलमान खानला तिथे जाणे शक्य नव्हते.

 

View this post on Instagram

 

Will always love you...

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

अब्दुल्लाच्या मृत्यूवर सलमान खानचे मॅनेजर जॉर्डी पटेल म्हणाले की अब्दुल्लाला हृदयविकाराचा झटका आला. तसेच त्याला लंग इंफेक्शन संसर्ग देखील झाले होते. सलमान पनवेलच्या फार्महाऊसमध्ये आहे, त्यामुळे तो प्रवास करू शकत नाही. अब्दुल्लाच्या अंत्यसंस्कारात तो इंदोरला जाऊ शकला नाही. परंतु नंतर सलमान अब्दुल्लाच्या कुटूंबाला भेटण्यासाठी इंदोरला जाणार आहे. सलमान खान अब्दुल्लाचा अगदी जवळचा होता आणि या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंग होतं.

First published: April 1, 2020, 2:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading