मुंबई, 18 मे : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'मलाल' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या सिनेमातून जावेद जाफरीचा मुलगा मीजान जाफरी आणि संजय लीला भन्साळी यांची भाची शरमिन सेहगल बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शरमिन आणि मीजानला शुभेच्छा दिल्या. मग यात दबंग खान सलमान तरी मागे कसा राहील. सलमाननंही खास अंदाजात शरमिनला शुभेच्छा दिल्या.
सलमाननं 1999मध्ये आलेला ऐश्वर्या राय सोबतचा त्याचा सिनेमा 'हम दिल दे चुके सनम' मधील एक फोटो ट्विटरवर शेअर करत शरमिन सेहगलला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा शरमिनच्या बालपणीचा 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवरील फोटो आहे. ज्यात सलमान, संजय लीला भन्साळी आणि लहानगी शरमिन दिसत आहेत. सलमानच्या मागच्या बाजूला ऐश्वर्या उभी आहे. तिचा चेहरा दिसत नसला तरीही या तिच्या ड्रेसवरून ती ऐश्वर्याच असल्याचं समजतं. जो ड्रेस तिनं या सिनेमाच्या टायटल साँगमध्ये घातला होता. मात्र हा फोटो शेअर करताना सलमाननं ऐश्वर्याचा चेहरा क्रॉप केला आहे.
शरमिनला शुभेच्छा देताना सलमाननं लिहिलं, 'या फोटोमधील गोंडस लहान मुलगी शरमिनला आता सिल्व्हर स्क्रिनवर पाहण्याची वेळ झाली आहे. मलाल पासून सुरू होत असलेल्या तुझ्या या प्रवासत तुला खूप सारं यश आणि प्रेम मिळो.' सलमाननं जरी हा फोटो क्रॉप करून वापरला असला तरीही त्याच्या चाहत्यांच्या नजरेतून मात्र त्याची ही चालाखी सुटलेली नाही त्यामुळे आता त्याच्या ट्वीटवर चाहत्याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
A post shared by SalAish (@salman.aishwarya.world) on
सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'हम दिल दे चुके सनम' बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता आणि या सिनेमानंतरच सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या होत्या. या सिनेमाचं दिग्दर्शनही संजय लीला भन्साळी यांनीच केलं होतं.