काम न मिळाल्यामुळे हे पाच कलाकार झाले कंगाल, कोणी केली आत्महत्या तर काहीने विकला बंगला

त्यांचं पार्थिव सडलेल्या अवस्थेत राहत्या घरी सापडलं. त्यांना १८ वर्षांपासून एकाही सिनेमात काम मिळाले नव्हते.

News18 Lokmat | Updated On: Mar 31, 2019 08:58 PM IST

काम न मिळाल्यामुळे हे पाच कलाकार झाले कंगाल, कोणी केली आत्महत्या तर काहीने विकला बंगला

कोरिओग्राफर सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचं धक्कादायक विधान केलं होतं. असं म्हटलं जातं की, सलमानला जेव्हा ही गोष्ट कळली त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये काम देण्याचं आश्वासन दिलं. सरोजप्रमाणे सिनेसृष्टीत असे अनेक आर्टिस्ट आहेत जे आर्थिक तंगीला सामोरे गेले आहेत.

८० आणि ९० च्या दशकातील प्रसिद्ध खलनायक महेश आनंद यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांचं पार्थिव सडलेल्या अवस्थेत त्यांच्या राहत्या घरी सापडलं. ५७ वर्षांच्या महेश यांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. त्यांना १८ वर्षांपासून एकाही सिनेमात काम मिळाले नव्हते.

सलमान खानसोबत काम केलेली अभिनेत्री पूजा डडवालचीही आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. आर्थिक मदतीसाठी तिने सलमानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्याशी बोलणं होऊ शकलं नाही. जेव्हा सलमानला ही गोष्ट कळली तो मदतीसाठी पुढे आला. पूजाकडे टीबीचा उपचार घेण्याचेही पैसे नव्हते. १९९५ मध्ये वीरगती सिनेमातून पूजाने सिनेकरिअरला सुरुवात केली. या सिनेमात तिच्यासोबत सलमान खान होता.

Loading...

अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलेले अभिनेते सतीश कौल यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. यावर्षी जानेवारीमध्ये त्यांच्याबद्दल बातमी छापून आली होती. यानंतर पंजाब सरकारने त्यांना ५ लाखांची मदत केली. एका व्यवसायात सतीश यांना फार नुकसान झालं. यानंतर रुग्णालयात उपचार घेण्याचेही पैसे त्यांच्याकडे नव्हते.

१९६३-६९ दरम्यान राजेंद्र कुमार यांचे सर्व सिनेमे सुपरहिट होते. पण एकवेळ अशी आली होती की, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती. एवढं की त्यांनी त्यांचा बंगला राजेश खन्ना यांना विकला होता. या बंगल्याचं तेव्हा डिंपल होतं. तेव्हाचे लोक असं म्हणायचे की, जेव्हा राजेंद्र कुमार यांनी तो बंगला सोडला त्या रात्री ते ढसाढसा रडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 08:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...