मुंबई, १६ एप्रिल- सलमान खान सध्या त्याच्या भारत आणि दबंग ३ सिनेमांमुळे भलताच चर्चेत आहे. काल १५ एप्रिलला त्याच्या भारत सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं होतं. या पोस्टरमध्ये तो म्हातारा दाखवण्यात आला होता. पण आता नुकताच या सिनेमातला त्याचा नवा लुक समोर आला आहे.
मंगळवारी प्रदर्शित केलेल्या नव्या पोस्टरमध्ये सलमान फार तरुण दिसत आहे. या फोटोला सलमानने कॅप्शन दिले की, ‘जवानी हमारी जानेमन थी...’ या लुकमध्ये तो फार डॅशिंग दिसत आहे. तर सोमवारी शेअर केलेल्या म्हाताऱ्या लुकला सलमानने कॅप्शन दिले होते की, ‘जेवढे पांढरे केस माझ्या केसांवर आणि दाढीवर आहेत त्याहून बहूरंगी माझं आयुष्य राहिलं आहे.’
सलमानचा असा अंदाज त्याच्या आधीच्या कोणत्याच सिनेमात पाहण्यात आला नव्हता. त्यामुळे या सिनेमाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये कमालिची उत्सुकता पाहायला मिळते. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमात सलमानसोबत कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर २४ एप्रिलला या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात येणार आहे.
‘भारत’च्या या पोस्टरवर ‘एका माणसाचा आणि देशाचा सहप्रवास’ असं कॅप्शन लिहिण्यात आलं आहे. हेच कॅप्शन भारत सिनेमाची टॅगलाइनही आहे. या सिनेमाशिवाय सलमान खान सध्या ‘दबंग ३’ सिनेमामुळेही चर्चेत आहे. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असून या सिनेमात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे.
SPECIAL REPORT : पुण्यातील उमेदवाराचा हटके प्रचार; ना वाहनांचा ताफा, ना कार्यकर्त्यांची फौज