मुंबई, २२ जानेवारी २०१९- बॉलिवूड स्टार्सच्या डुप्लिकेटबद्दल अनेक बातम्या सतत येत असतात. मात्र यावेळी बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचाच डुप्लिकेट दिसला आहे. विशेष म्हणजे हा डुप्लिकेट भारतात नसून पाकिस्तानात दिसला.
सध्या या डुप्लिकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमानच्या पाकिस्तानातील चाहत्यांच्या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती कराचीमध्ये राहणारी आहे. सलमानच्या या डुप्लिकेटने सलमानसारखीच हेअरस्टाइल आणि बॉडी बनवली आहे. त्यामुळे पटकन या व्यक्तीला पाहिलं की सलमान खानच आला की काय असा प्रश्न त्याच्या बाजूच्या लोकांना पडतो.
डुप्लिकेटने ज्या पद्धतीने सलमानला कॉपी केलं आहे, ते पाहून तो सलमानचा फार मोठा चाहता वाटत आहे. तसं पाहायला गेलं तर फक्त भारत पाकिस्तानमध्येच नाही तर सलमानचे जगभरात चाहते आहेत.
या डुप्लिकेटचा चेहरा सलमानशी इतका मिळता जुळता आहे की, रस्त्यावरून जाणारे लोक त्याला पटकन सलमानच समजतात. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. तर काही लोक त्याला सलमान खान नावाने हाकही मारत आहेत.
Watch: Salman Khan's lookalike spotted in Karachi.@SherySyed_ @khalid_pk pic.twitter.com/xyqUuNiBfN
— حاجی موسیٰ سوریا (@HajiMoosaSuriya) January 19, 2019
सलमानला बॉलिवूडचा सुपरस्टार उगाच म्हटलं जात नाही. इतर अनेक बॉलिवूड कलाकारांचे जगभरात चाहते आहेत. मात्र सलमानच्या चाहत्यांमध्ये त्याची असलेली क्रेज थोडी वेगळीच आहे. दबंग खानची एक झलक पाहता यावी म्हणून त्याच्या चाहत्यांची वाटेल ते करायची तयारी आहे. याशिवाय सलमानची स्टाइल चाहत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे. त्याच्या हेअरस्टाइलपासून ते त्याच्या चालण्याच्या पद्धतीपासून सगळंच त्याचे चाहते कॉपी करत असतात.
'मला विकू नका' : डोळ्यात पाणी आणणारा दुष्काळी भागातला Ground Report