कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीला सलमान खानने केलं 'सुपरस्टार'

बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानला अनेकजण 'गॉड फादर' मानतात. त्याने अनेक कलाकारांना सिनेसृष्टीत काम मिळवून दिलं. तसेच काहींना तर यशाच्या शिखरावरही बसवलं.

News18 Lokmat | Updated On: May 14, 2019 04:27 PM IST

कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य मुलीला सलमान खानने केलं 'सुपरस्टार'

बॉलिवूडचा दबंग सलमान खानला अनेकजण गॉड फादर मानतात. त्याने अनेक कलाकारांना सिनेसृष्टीत काम मिळवून दिलं. तसेच काहींना तर यशाच्या शिखरावरही बसवलं. अनेक स्टार्सना सलमानने स्वतः सिनेसृष्टीत लॉन्च केलं आहे.

२०१० मध्ये आलेल्या वीर सिनेमातून त्याने जरीन खानला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. लोकांनी तिचं पहिल्याच सिनेमात भरभरून कौतुक केलं होतं. असंही म्हटलं जात होतं की लवकरच ती बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींन मागे सोडेल. पण वास्तवात असं काही झालं नाही.

जरीन खान बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी फार वेगळी दिसायची. तिचं वजनही १०० किलोंपेक्षा जास्त होतं. स्वतः जरीनने एका पोस्टवरून याबद्दल सविस्तर सांगितले होते. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तिने वजनावर नियंत्रण ठेवले होते.

Loading...

एका भूमिकेसाठी तिने पुन्हा वजन वाढवले होते. यासाठी सोशल मीडियावर तिला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. जरीन तिच्या लुकमुळेही बरीच चर्चेत होती. आजही अनेकांना तिचा चेहरा हा कतरिन कैफसारखा वाटतो.

सलमान खानसोबत २०१० मध्ये आलेल्या वीर सिनेमातून जरीनने बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. पण त्यानंतर तिच्या नावाची खरी चर्चा झाली ती बोल्ड सीन देण्यासाठीच. हेट स्टोरी- ३, अक्सर- २ आणि वजह तुम हो या सिनेमांमध्ये तिने अनेक बोल्ड सीन दिले होते.

जरीन खानबद्दल म्हटलं जातं की, तिचे आई- बाबा ती लहान असतानाच विभक्त झाले होते. तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे पॉकेट मनीसाठी जरीन कॉल सेंटरमध्ये काम करायची. अभिनेत्री व्हावं अशी जरीनची कधीच इच्छा नव्हती. तिला आधीपासूनच डॉक्टर व्हायचे होते.

असं म्हटलं जातं की, सलमानने जरीनला पहिल्यांदा युवराजच्या सेटवर पाहिले होते. तेव्हाच त्याला जरीनमध्ये राजकुमारीची झलक दिसली. यामुळे सलमानने तिला वीर सिनेमात कास्ट करण्याचा विचार केला. यानंतर रितसर जरीनचं ऑडिश झालं आणि तिची निवड करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...