अली अब्बासने शेअर केला ‘भारत’चा नवा फोटो

अली अब्बासने शेअर केला ‘भारत’चा नवा फोटो

सलमानचा हा फोटो पाहून त्याचे चाहते नक्कीच आनंदीत होतील यात काही शंका नाही.

  • Share this:

मुंबई, 12 मे- सलमान खान स्टारर आगामी 'भारत' सिनेमाची सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाची गाणी याआधीच लोकांना आवडल असून आता सिनेमाच्या दिग्दर्शकाने अली अब्बास जफरने सलमानचा नवीन फोटो शेअर केला आहे.

सलमानचा हा फोटो पाहून त्याचे चाहते नक्कीच आनंदीत होतील यात काही शंका नाही. या फोटोमध्ये सलमान नेव्हीच्या गणवेशात दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तो रागात असल्याचं दिसतं. या सिनेमात तो पाच वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.

1.5 कोटींचं फक्त जिम, शाहरुख- अमिताभ यांच्यापेक्षाही दुप्पट महाग गाडी वापरतो हा सुपरस्टार

३ मिनिट ११ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सिनेमा नक्की काय असणार आहे ते स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यापासून सलमानची गोष्ट सुरू होते. सलमान सर्कसमध्ये ‘मौत का कुआ’त बाइक चालवताना दिसतो. दिशा पटानीही सर्कसमध्ये त्याच्यासोबत काम करताना दाखवण्यात आली आहे. यानंतर तो दुसरी नोकरी करण्यासाठी सरकारी कार्यालयात जातो. इथे त्याची ओळख कतरिना कैफशी होते. इथे त्याला काम मिळतं. याचदरम्यान एक अशी घटना होते ज्यात सलमान भूतकाळात जातो.

मध्यरात्री ‘सैफिना’सोबत डिनर डेटला गेले अर्जुन- मलायका

 

View this post on Instagram

 

Bharat @beingsalmankhan #eid 2019

A post shared by ali (@aliabbaszafar) on

या फ्लॅशबॅकमध्ये जॅकी श्रॉफ दिसतो. जॅकीने सिनेमात सलमानच्या वडिलांची भूमिका केली आहे. यानंतर सलमान मर्चंट नेवीच्या ड्रेसमध्ये दिसतो. शेवटी वाघा बॉर्डवरवरचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनचा फोटो सलमानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. सलमान खानचा हा सिनेमा यावर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे.

Happy Mother's Day 2019: या प्रसिद्ध सेलिब्रिटींचे आईसोबतचे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?

First published: May 12, 2019, 5:48 PM IST

ताज्या बातम्या