‘पीएम नरेंद्र मोदी’ मध्ये हे गाणं वापरल्यामुळे भडकला सलमान खान

‘पीएम नरेंद्र मोदी’ मध्ये हे गाणं वापरल्यामुळे भडकला सलमान खान

आता विवेक ओबेरॉय त्याच्या सिनेमात सलमानचंच गाणं वापरल्याने तो चांगलाच भडकला आहे.

  • Share this:

मुंबई, २७ मार्च- विवेक ओबेरॉयचा आगामी सिनेमा पीएम नरेंद्र मोदी सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आता हा सिनेमा सलमान खानच्या कनेक्शनमुळेही चर्चेत आहे. त्याचे झाले असे की, या सिनेमात ‘दस’ सिनेमातील सलमानचे ‘सुनो गौर से दुनिया’ हे गाणं घेण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानला नेमकी हीच गोष्ट आवडलेली नाही.

असं असलं तरी पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचे निर्माते संदीप सिंह यांनी याचं स्पष्टीकरण देत म्हटलं होतं की, ‘१९४७ अर्थ’ सिनेमातून इश्वर अल्लाह आणि दस सिनेमातून सुनो गौर से दुनियावालो या गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. यासाठी गाण्यांच्या लेखकांना क्रेडिटही देण्यात आलं आहे. निर्मात्याच्या या स्पष्टीकरणानंतर कॉन्ट्रोव्हर्सी होता होता राहिली असली तरी सलमानला निर्मात्यांचं हे म्हणणं पटलेलं नाही.

हे गाणं सलमान खान, संजय दत्त, रवीना टंडण आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर चित्रीत झालं आहे. हे गाणं मुकुल आनंद यांच्या दस सिनेमासाठी तयार करण्यात आलं होतं. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं आकस्मित निधन झालं. मुकुल यांच्या निधनानंतर हा प्रोजेक्टही बंद झाला. आता विवेक ओबेरॉय त्याच्या सिनेमात त्याचं गाणं वापरत असल्याचा सलमानला राग आहे.

First published: March 27, 2019, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading