Home /News /news /

VIDEO: वडिल सलीम खान यांना नाही भेटू शकत सलमान खान, म्हणाला 'मी खूप घाबरलोय'

VIDEO: वडिल सलीम खान यांना नाही भेटू शकत सलमान खान, म्हणाला 'मी खूप घाबरलोय'

हा डॉयलॉग काही कामाचा नाही आम्ही खरंच घाबरलो आहे असं सलमान खानने म्हटलं आहे.

  मुंबई, 06 एप्रिल : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आजकाल पनवेल फार्महाऊसमध्ये आहे, तर त्याचे वडील सलीम खान दुसरीकडे घरात एकटेच आहेत. त्याने व्हिडिओद्वारे सांगितले की तो गेल्या तीन आठवड्यांपासून आपल्या वडिलांना भेटू शकला नाही, कारण तो सेल्फ आइसोलेशनमध्ये आहे. 'जो डर गया समझो मर गया' हा हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग सगळ्यांनाच माहित आहे. तोच वापरत सलमानने या कोरोना विषाणूसंबंधी म्हटलं आहे. हा डॉयलॉग काही कामाचा नाही आम्ही खरंच घाबरलो आहे असं सलमान खानने म्हटलं आहे. यासंबंधी एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, 'मी सलमान आहे आणि हा सोहेलचा मुलगा निर्वाण आहे. आम्ही काही दिवसांसाठी (पनवेल फार्महाऊस) आलो आणि आता इथे आहोत. आम्हाला खूप भीती वाटते. मी आणि निर्वाणाने तीन आठवड्यांपासून त्याच्या वडिलांना पाहिले नाही. कारण आम्ही येथे आहोत आणि वडील एकटेच घरी आहेत. 'जो डर गया समझो मर गया' हा फेमस डायलॉग आहे जो इथे लागू होत नाही. अत्यंत निर्भयपणे सांगतो आम्ही खूप घाबरलो आहे. तुम्हीही शूर होऊ नका. कारण तो घाबरला तो वाचला आणि त्याने वाचवलं आहे'
  View this post on Instagram

  Be Home n Be Safe @nirvankhan15

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  यानंतर सलमान निर्वाणाला विचारतो, "यावेळी घरीच राहणे सुरक्षित आहे. लोकांपासून दूर रहा. मला असे वाटते की आपण घरामध्ये जास्त काळ राहू, साथीचे रोगापासून वाचू. मग सलमान म्हणतो, "ज्याला भीती वाटायची तो वाचला आणि त्याने बऱ्याच लोकांना वाचवले. पण एकूणच, आम्ही घाबरलो आहोत." नुकताच पनवेल फार्महाऊसमध्ये अर्पिता आणि आयुष यांचा मुलगा अहिल यांचा वाढदिवस मोठ्या साधेपणाने साजरा करण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सलमानसोबत अर्पिताच्या कुटूंबाचीही साथ आहे. सलमान खानने फिल्म इंडस्ट्रीतील 25,000 दैनिक वेतन मजुरांना मदत करण्याचे ठरविले आहे, ज्यांचे जीवन राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रभावित झाले आहे, ज्याचा बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीच्या सर्व कामांवर परिणाम झाला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसीआय) चे अध्यक्ष बीएन तिवारी म्हणाले की, कलाकारांमध्ये सलमानचे योगदान उपयोगी ठरेल.
  View this post on Instagram

  @cmomaharashtra_ @My_bmc @adityathackeray @rahulnarainkanal

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  View this post on Instagram

  A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

  जगभरात कोरोनाव्हायरसच्या प्राणघातक उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीमुळे चित्रपटांचे शूटींग थांबविण्यात आले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आपल्या आवडते काम रंगकाम करत या मोकळ्या वेळेचा उपयोग करीत आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान आपल्या आगामी ‘राधे : योर मोस्ट वान्टेड भाई’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, पण आता या मोकळ्या काळात त्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चित्रकला करताना दिसत आहे.
  Published by:Manoj Khandekar
  First published:

  Tags: Corona, Salman khan

  पुढील बातम्या