सलमाननं सांगितलं कोण आहे त्याची ड्रीमलव्ह?

सलमाननं सांगितलं कोण आहे त्याची ड्रीमलव्ह?

  • Share this:

मुंबई, 06 आॅगस्ट : सलमान खानचं ड्रीमलव्ह कोण असा प्रश्न त्याला नुकताच विचारण्यात आला. निमित्त होतं लव्हरात्री सिनेमाच्या पत्रकार परिषदेचं. सलमान खान आणि युलिया वेंटूर यांच्या अफेअरबद्दल नेहमीच बोललं जातं. त्यामुळे सलमानच्या ड्रीम लव्ह आणि खऱ्या आयुष्यातील प्रेम काय याबद्दल सलमान खान काय उत्तर देणार याची उत्सुकता साहजिकच सर्वांना होती. पण नेहमीप्रमाणे सलमान खानने इथेही फिरकी घेतली. जो भी है अच्छा है असं सांगत त्याने जास्त काही न सांगणंच पसंत केलं.

सलमान खान प्रोडक्शन 'लवरात्री' हा सिनेमा नवरात्रीत भेटीला येणार आहे. सलमान खानचा भाऊजी आयुष शर्माचा हा पहिला-वहिला सिनेमा नवरात्री उत्सवाला आपल्या सगळ्यांच्या भेटीला आला आहे.

या सिनेमातून आयुष शर्मा आणि वारिना हुसेन सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत. या सिनेमाचं पहिलं लूक आणि प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अभिनेता सलमान खान यानेही या सिनेमाच्या ट्रेलर रिलीज झाल्याचं चाहत्यांना सांगत ट्विट केलं आहे.

First published: August 7, 2018, 8:50 AM IST

ताज्या बातम्या