वाराणसी, १० एप्रिल- सलमान खानने त्याचा आगामी 'दबंग ३' सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. पण चित्रीकरण सुरू होऊन काही दिवस लोटले नाहीत तोच चित्रीकरणावर संकटाचे ढग जमा झाले आहेत. सध्या सलमान खान मध्य प्रदेशमध्ये सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. दबंग खानला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (ASI) नोटीस बजावण्यात आली आहे.
ASI ने सलमान आणि त्याच्या टीमला मध्यप्रदेशच्या मांडू येथील ऐतिहासिक जल महालात उभारण्यात आलेले दोन सेट हटवण्याचे आदेश दिले आहेत. नोटीसमध्ये ही अटही घालण्यात आली की निर्मात्यांनी जर एएसआयचा आदेश मान्य केला नाही तर सिनेमाचं चित्रीकरण रद्दही करण्यात येईल. मीडिया रिपोर्टनुसार, प्रोडक्शन हाउसला या संदर्भात आधीच माहिती देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून कोणतीच अक्शन घेण्यात आली नाही. नोटीसमध्ये लिहिलेल्या मजकूरानुसार सिनेमाच्या टीमने हवा महलात सेट उभा करून प्राचीन स्मारक आणि पुरातत्व स्थळ आणि अवशेष अधिनियम १९५९ च्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
याशिवाय नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मुर्तीचं नुकसान केल्याचा आरोपही 'दबंग ३' च्या टीम लावण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार, किल्ल्यातून सेट हलवताना तेथील प्राचीन मुर्तीला तडा गेला.
या सर्व प्रकरणावर आपलं मत व्यक्त करताना सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्म साधो म्हणाल्या की, ‘जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं. मी किल्ल्यात जाऊन सर्व गोष्टी पाहीन. जर त्या लोकांनी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान चुकीचं काही केलं असेल तर त्यांच्याविरोधाक कारवाई करण्यात येईल.’
VIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज