सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेलं ट्वीट होतंय व्हायरल, तुम्ही पाहिलंत का?

नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. सलमान खानलाही या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र भारत सिनेमाच्या प्रमोशनमुळे तो या समारंभाला जाऊ शकला नाही.

  • Share this:

मुंबई, 03 जून- बॉलिवूडचा दबंग अर्थात सलमान खान सध्या त्याच्या भारत सिनेमाच्या प्रदर्शनामध्ये व्यग्र आहे. येत्या ५ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. दरम्यान, सलमानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने मोदींना त्यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. सलमानचं हे ट्वीट सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमानचे चाहतेही मोदींना याच ट्वीटवर शुभेच्छा देताना आणि त्यांचं अभिनंदन करताना दिसत आहेत.

Makeup Official Teaser- दारू पिऊन घरातल्यांना शिव्या देतेय रिंकू राजगुरू

सलमानने लोकसभा निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना मिळालेल्या भरघोस यशाच्या शुभेच्छा दिल्या. सलमानने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘माननीय पंतप्रधान तुमच्या सर्वोत्कृष्ट टीमचं अभिनंदन. भारताला मजबूत आणि एकसमान करण्याच्या तुमच्या प्रयत्नांसाठी पूर्ण टीमला शुभेच्छा.’

बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सलमानसोबत या सेलिब्रेटींनी लावली हजेरी, एकदा हे फोटो पाहाच

नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास ८ हजार लोक आले होते. सलमान खानलाही या कार्यक्रमाचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र भारत सिनेमाच्या प्रमोशनमुळे तो या समारंभाला जाऊ शकला नाही. पण सलमानने ट्विटरच्या माध्यमातून मोदीचं अभिनंदन केलं होतं.

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

सलमानच्या भारत सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर येत्या ईदला अर्थात ५ जून रोजी सलमानचा बहूप्रतिक्षित भारत सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि सुनील ग्रोवरची मुख्य भूमिका आहे. या सिनेमातून सलमानच्या चाहत्यांना त्याचे पाच वेगवेगळे लुक पाहायला मिळणार आहेत. सलमानचा कतरिनासोबतचा हा सहावा सिनेमा आहे.

प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

First published: June 3, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या