सलीम खान यांचा खुलासा, लीक पेपरच्या मदतीने पास झाला होता ‘दबंग खान’

कपिलच्या शोमध्ये त्याचे दोन्ही भाऊ अरबाज- सोहेल आणि वडील सलीम खान गेले होते. सलीम यांनी सलमानची अनेक गुपीतं उघड केली.

  • Share this:

प्रसिद्ध विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाल करताना दिसत आहे. त्याचा द कपिल शर्मा शो पुन्हा लाँच झाला आहे. या शोमध्ये सलमान दोन्ही भावांसोबत आणि वडिलांसोबत आला होता. दरम्यान, शोमध्ये सलीम यांनी सलमानची अनेक गुपीतं उघड केली आहेत.

कपिलच्या शोमध्ये त्याचे दोन्ही भाऊ अरबाज- सोहेल आणि वडील सलीम खान गेले होते. शोमध्ये साऱ्यांची फार धमाल केली. शोमध्ये आतापर्यंत खान कुटुंबातील अनेक गुपितं बाहेर आली. यातला सर्वात मोठा खुलासा म्हणजे सलीम खान यांनी कपिलला सांगितले की, सलमान लीक पेपरच्या मदतीने परीक्षा पास होत होता.

सलीम म्हणाले की, ‘आमच्या घरी एक माणूस यायचा. गणेश आला.. गणेश आला.. गणेशला चहा द्या.. गणेशला बसायला खुर्ची द्या.. मी विचारलं हा गणेश कोण आहे, ज्याला माझ्याच घरात माझ्यापेक्षा जास्त आदर दिला जात आहे. नंतर कळलं की तो लीक पेपर घेऊन घरी यायचा. त्यानंतर सलमानने सांगितलं की गणेश सलमानसाठी नेहमीच पेपर लीक करायचा.’

सलमानच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, सध्या दबंग खान ‘भारत’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहे. सुरुवातीला या सिनेमात प्रियांका चोप्रा काम करणार होती. मात्र लग्नामुळे ‘देसी गर्ल’ने सिनेमातून काढता पाय घेतला. यामुळे पुन्हा एकदा सलमान आणि कतरिनाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सिनेमात सलमान कतरिनासोबत नोरा फतेही, दिशा पटान, तब्बू आणि सुनील ग्रोवर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. हा सिनेमा कोरियन ड्रामा ‘ओडे टू माय फादर’वर आधारित आहे. यावर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2019 10:26 AM IST

ताज्या बातम्या