डॉ. सलील कुलकर्णीच्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर प्रदर्शित

डॉ. सलील कुलकर्णीच्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर प्रदर्शित

पहिल्यांदा या सिनेमाच्या माध्यमातून डॉ. सलील कुलकर्णी लेखक आणि दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणार आहे.

  • Share this:

गेली जवळजवळ २० वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक अशा विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं हं, कुणी जेवल्यावाचून नाही जायचं हं’ अशी लग्नात म्हटली जाणारी वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार या चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून ‘वेडिंग चा शिनेमा’ हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती घेरू आणि पीइएसबी यांनी केली केली असून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

सलील कुलकर्णी रंगमंचावरून गायला लागला आणि ‘चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ म्हणत त्याने आपली मनं जिंकली. संगीतकार म्हणून ३५ पेक्षा आधिक चित्रपटाची गाणी केली आणि ‘डीबाडी डीपांग‌’ किंवा ‘देही‌ वणवा ‌पिसाटला’पासून ते ‘एकटी एकटी घाबरलीस ना’पर्यंत त्याने आपल्याला आनंद दिला. ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ऐकून आपले डोळे पाणावले आणि विंदा करंदीकर यांच्या ‘एका माकडाने काढले दुकान’पासून ‘अग्गोबाई ढग्गोबाई’पर्यंत गाण्यांवर आपली लहान मुलं हसली, नाचली. त्याच्या बालगीतावर प्रत्येक शाळेत बालगोपाल रमले.

बा. भ. बोरकर, आरती प्रभू, कुसुमाग्रज यांच्या कवितांची त्याने गाणी केली आणि तरुणांना, ‘तव नयनांचे दल हलले ग’सारखी गाणी त्यांची वाटली. परीक्षक म्हणून ‘सा रे ग म’ किंवा ‘गौरव महाराष्ट्राचा’मधून अनेक नवीन गायकांना घडवताना आपण त्याच्या चपखल कमेंट्स ऐकल्या. ‘मधली सुट्टी’मध्ये लहान मुलांचा सगळ्यात जवळचा मित्र होताना पाहिलं.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या नावावर अनेक हिट मराठी चित्रपटांची नोंद आहे. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘हापूस’, ‘आयडीयाची कल्पना’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘कॉफी आणि बरेच काही’, ‘टाइम प्लीज’, ‘मुंबई पुणे मुंबई-२’, ‘बापजन्म’, ‘आम्ही दोघी’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई-३’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.

VIDEO : फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार हे धमाकेदार सिनेमे, रणवीर सिंगकडून प्रेक्षकांची अपेक्षा

First published: January 29, 2019, 5:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading