मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुलुंडमध्ये कोरोना औषधांची करत होता फ्री होम डिलीव्हरी, एफडीएनं टाकली धाड

मुलुंडमध्ये कोरोना औषधांची करत होता फ्री होम डिलीव्हरी, एफडीएनं टाकली धाड

मुलुंडमध्ये एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कोरोनावर इलाज करणारी औषधं विकण्यात येत होती.

मुलुंडमध्ये एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कोरोनावर इलाज करणारी औषधं विकण्यात येत होती.

मुलुंडमध्ये एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कोरोनावर इलाज करणारी औषधं विकण्यात येत होती.

मुंबई, 17 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या महाभयंकर आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण या परिस्थितीचा फायदा घेणारेदेखील कमी नाहीत. मुलुंडमध्ये सामान्य नागरिकांना लुटण्याचा असाच एक प्रकार समोर आला आहे. मुलुंडमध्ये कोरोनावर उपाय म्हणून गोळ्या विकण्याचं काम सुरू आहे. या गोळ्या विकून लोकांना लुटणाऱ्या आणि त्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका आयुर्वेदिक भंडारवर एफडीएने धाड टाकली आहे.

मुलुंडमध्ये एका आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात कोरोनावर इलाज करणारी औषधं विकण्यात येत होती. या दुकानाच्या मुलुंडसह घाटकोपर, विलेपार्ले, कांदिवलीला शाखा आहेत. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी रोगप्रतिकारक औषधं आमच्या येथे मिळतील असं या औषधांचं मार्केटिंगदेखील करण्यात आलं. इतकंच नाही तर या औषधांची फ्री होम डिलीव्हरीदेखील करण्यात येईल असं लिहिण्यात आलं आहे. ही बाब समजताच एफडीएने दुकानावर धाड टाकली आहे.

'कोरोना बाबा'ला पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोरोनासारख्या आजाराचा गैरफायदा घेणारं एक काही पहिलं प्रकरण नाही. एका 'कोरोना बाबा'ला पोलिसांनी गेल्या काही दिवसांआधी ताब्यात घेतलं होतं. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या वजीरगंज पोलिसांनी सीएमओच्या तक्रारीवरून अहमद सिद्दीकी नावाच्या ढोगी तांत्रिकाला अटक केली. अहमद सिद्दीकी याने त्याच्या दुकानाबाहेर एक फलक लावला होता, ज्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की, जे लोक मास्क विकत घेऊ शकत नाहीत, त्यांनी त्याच्याकडील सिद्ध केलेलं तावीज विकत घ्यावं. हा ढोंगी बाबा फक्त 11 रुपयांना तावीज विकत होता. त्याने असा दावा केला की, हे तावीज बांधल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही.

सीएमओने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर वजीरगंज पोलिसांनी फसवणुकीच्या कलमाअन्वये अहमद सिद्दीकीला अटक केली. लखनऊचे अतिरिक्त सीपी (पश्चिम) विकास चंद्र त्रिपाठी यांनी सांगितले की, जवाहर नगर येथील रहिवासी अहमद सिद्दीकी यांच्याबद्दल सीएमओकडून तक्रार आली होती. त्याला फसवणुकीच्या कलमान्वये अटक केली. सीएमओंनी दावा केला आहे की, आरोपी स्वत:ला कोरोना बाबा म्हणत तावीज विकून लोकांची फसवणूक करीत होता.

तयार केले बनावट सॅनिटायजर, नागपूरमध्ये घडला धक्कादायक प्रकार

नावट सॅनिटायजर तयार करून ते विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भामट्यांना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. विक्की खानचंदानी आणि जितेंद्र मुलानी असं जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सॅनिटायजरच्या मागणीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या मागणीचा फायदा घेत अनेकांनी याचा काळाबाजार करण्यास सुरुवात केली. विक्की खानचंदानी याने एमआयडीसी परिसरातील अनेक मेडिकल स्टोर्समध्ये जाऊन सॅनिटायजर विकण्याचा प्रयत्न केला.

15 आणि 50 मिलिलिटरच्या सॅनिटायजर बॉटल विकण्याचा प्रयत्न करीत असताना एका जागरूक मेडिकल स्टोर संचालकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विक्कीला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून सॅनिटायजर च्या 65 बॉटल जप्त केल्या. हे सॅनिटायजर भेसळयुक्त असून त्याला आग लावल्यास बराच वेळ जळत राहते, या भेसळ युक्त सॅनिटायजर मध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट, रसायन,कापूर आणि पाण्याचा वापर केल्याने हे सॅनिटायजर घातक असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus