‘आर्ची’चा झाला मेकओव्हर, ग्लॅमरस रूपातल्या रिंकू राजगुरूला ओळखलत का?

सिनेमा प्रदर्शित होऊन एवढी वर्ष झाली, पण अजूनही तिची क्रेझ कमी झालेली नाही.

  • Share this:

सैराट सिनेमामुळे आर्ची-परशा म्हणजे रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर घराघरात पोहोचले. रिंकूला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

सिनेमा प्रदर्शित होऊन एवढी वर्ष झाली, पण अजूनही तिची क्रेझ कमी झालेली नाही. आजही तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते वाटेल ते करायला तयार असतात.

सैराट सिनेमावेळी रिंकू फार लहान होती. मात्र त्यानंतर रिंकूने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने योग्य व्यायाम आणि डाएटिंगही सुरू केलं. अवघ्या दोन महिन्यांत तिने १२ किलो वजन कमी केलं.

व्यायामासाटी रिंकू पहाटे चारला उठायची. थोडं चालल्यानंतर ती वॉर्मअप करायची मग व्यायामाला सुरुवात करायची. असं तिने एक दोन दिवस नाही तर कित्येक महिने केलं.

तिने तिच्या डाएटवरही विशेष लक्ष दिलं. ती सकाळ संध्याकाळ फक्त सलाड खायची. रिंकूला गोड पदार्थ खायला फार आवडतं. मात्र डाएटमुळे तिने सर्वांवर पाणी सोडलं होतं.

रिंकूसमोर कुणी गोड पदार्थ खात असेल तर ती तिथून उठून निघून जायची. तिच्या या मेहनतीचं फळ आता साऱ्यांनाच दिसत आहे. रिंकू खूप स्लिम अँड फिट झाली आहे.

विशेष म्हणजे यासाठी तिनं कुणी ट्रेनर ठेवला नव्हत. तिची आईच तिची ट्रेनर आणि डाएटिशियन होती. या सगळ्याचा फायदा असा झाला की, २ ते ३ महिन्यात तिचं १२ किलो वजन कमी झालं.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे.

सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचं दिग्दर्शन केलं आहे.

कागरचं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पाहायला मिळते. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींची गराडा अन् त्यात रिंकूच्या दिसण्यातला साज आणि नजरेतील करारीपणा हे एक्स्प्रेशन विलक्षण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या