दिलीप कुमार यांना प्रॉपर्टीसाठी धमक्या, सायरा बानो यांनी मोदींकडे मागितली मदत

दिलीप कुमार यांना प्रॉपर्टीसाठी धमक्या, सायरा बानो यांनी मोदींकडे मागितली मदत

प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी मोदींना साकड घातलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी मोदींकडे साकड घातलं आहे. भूमाफियांकडून मिळणाऱ्या धमक्यांविरोधात तक्रार करण्यासाठी सायरा बानो यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. 18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या विकासकामाच्या भूमिपूजनासाठी मुंबईला येणार आहेत. त्यावेळी भेटण्याची वेळ द्यावी अशी विनंती सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

समीर मोजवानी नावाचा व्यक्ती पैशांसाठी धमकावत असल्याचा आरोप सायरा बानोंनी केलाय. त्याच्याविरोधात तक्रार केल्यानंतरही त्याला सोडण्यात आल्याचंही सायरा बानो म्हणाल्या आहेत. याप्रकरणात मदत करण्यासाठी रविवारी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींना ट्विट केलं आणि भेटण्याची वेळ मागितली आहे.

ट्विटमध्ये सायरा बानो यांनी लिहलं की,

'दिलीप कुमार यांचं पाली हिल आणि वांद्र्यात घर आहे. बिल्डर समीर भोजवानी या जागेला हडपण्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी, समीर भोजवानी नुकताच जेलमधून सुटला आहे. याआधी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी आश्वासन दिल्यानंतरही यात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पद्म विभूषण दिलीप कुमार यांना वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणात मी तुम्हाला भेटू इच्छिते, कृपया मदत करा.'

प्रॉपर्टी हडपण्यासाठी समीर भोजवानी याने बोगस कागदपत्र बनवली असल्याचंही सायरा बानो यांनी सांगितलं आहे. काही सरकारी कर्मचारी समीर भोजवानीला मदत करत असल्याचा आरोपही सायरा बानो यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रदेखील लिहलं होतं.

VIDEO : झरीन खानला राग अनावर, तरुणांना दिले फटके

First published: December 16, 2018, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading