मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला भाजपने दिली उमेदवारी

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंहला भाजपने दिली उमेदवारी

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे.

  • Share this:

भोपाळ, 17 एप्रिल : मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात आरोपी असणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह यांना लढवण्याची खेळी भाजपने आखल्याचं स्पष्ट झालं आहे.

भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांना भेटण्यासाठी साध्वी प्रज्ञा भोपाळमध्ये भाजप कार्यालय गाठलं, त्याच वेळी त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार, अशी चर्चा सुरू झाली होती. रामलाल, प्रभात झा, शिवराजसिंह चौहान यांच्याशी साध्वी प्रज्ञा यांनी चर्चा केली. त्यानंतर थोड्याच वेळात भाजप पक्षप्रवेश केला.

साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचे उमेदवार देताना भाजप विशेष काळजी घेताना दिसत आहे. कारण, भोपाळच्या जागेवर दिग्विजय सिंह यांच्याविरोधात कुणाला उभं करायचं? यावर पक्षात भरपूर खल झाला.  दिग्विजय सिंह यांना टक्कर देण्यासासाठी माजी मुख्यमंत्री उमा भारती आणि शिवराज सिंह चौहान यांना मैदानात उतवरण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा झाली. पण, शेवटी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

पवारांनी कुटुंबाबाबत केलेल्या टीकेला मोदींकडून पहिल्यांदाच प्रत्युत्तर, पाहा VIDEO


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2019 04:40 PM IST

ताज्या बातम्या