बाबरी पाडायलाही गेले होते,राम मंदिर बांधायला ही जाईल-साध्वी प्रज्ञा

बाबरी पाडायलाही गेले होते,राम मंदिर बांधायला ही जाईल-साध्वी प्रज्ञा

  • Share this:

18 फेब्रुवारी: मी बाबरी पाडायलाही गेले होते आणि आता राम मंदिर  बांधायला ही जाईन असं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञा  यांनी केलं आहे.  त्या औरंगाबादेत एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

राम मंदीर हा जनमानसाची भावना आहे असंही त्या म्हणाल्या.  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत आणि ते चांगले आणि वेगळे काम करीत आहेत असही सिंग म्हणाल्या.

साध्वी प्रज्ञा  या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रमुख आरोपी होत्या. त्याप्रकरणी काही वर्ष त्यांना शिक्षाही झाली. नंतर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. बाबरी मशीद 1992 पाडली गेली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या होत्या. साध्वी प्रज्ञा सिंह यांचं आत्ताचं वय पाहता तेव्हा त्या महाविद्यालयात शिकत असाव्यात. बाबरी मशीद रामजन्मभूमीचा वाद 120 वर्ष जुना असून अजूनही हा वाद न्यायप्रविष्ट आहे.  लवकरंच रामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल लागेल   आणि तिथे मंदिर उभं राहणार अशी आशा  साध्वी प्रज्ञा यांना वाटते आहे. त्यामुळे लवकरच मंदिर उभं राहिल आणि ते बांधायला आपण जाऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

 

First published: February 18, 2018, 7:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading