अयोध्या, 23 मे : धार्मिक भावना दुखावल्याच्या आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रय्तन केल्याचा आरोप असलेला अलीगड मुस्लिम यूनिवर्सिटीचा (AMU) माजी विद्यार्थी शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) वर अयोध्येतील (Ayodhya) साधू-संत संतापले आहेत. शर्जील उस्मानीची जीभ कापणाऱ्याला 50 हजारांचं बक्षीस देण्याची घोषणा संतांकडून करण्यात आली आहे.
(वाचा-मराठा समाजाचा एल्गार, 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच!)
भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी IPC च्या कलम 505 नुसार शर्जील उस्मानीवर गुन्हा दाखल केला आहे. अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनीही शर्जील उस्मानीवरचा राग व्यक्त करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्या जीभेनं त्यानं जय श्री राम म्हणाऱ्यांबद्दल अपशब्द काढले, ती जीभ कापून आणणाऱ्याला 50 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. यानंतरही जर त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई झाली नाही तर माझ्याकडे शास्त्र आहे तसेच शस्त्रही आहे. अशा अधर्मी व्यक्तीचा अंत करण्यासाठी मी स्वतः जाईल असं ते म्हणाले.
महंत राजू दास हनुमानगडी म्हणाले की, दहशतवाद्यांना मानणाऱ्या उस्मानीने जय श्री राम म्हणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं आहे, हे दुर्दैवी आहे. मी पंतप्रधान, गृहमंत्री आणि माननीय राष्ट्रपतींना यावर कारवाई करण्याची विनंती करतो असंही ते म्हाले. हा व्यक्ती संपूर्ण देशात अशाप्रकारे दंगली भडकावण्याचं काम करत असल्याचं महंत राजूदास म्हणाले आहेत.
(वाचा-गुजरातला जाणाऱ्या गाडीतून कोट्यवधींची रक्कम जप्त; सकाळी नोटा मोजायला सुरुवात केल)
मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवाली असलेला शर्जील उस्मानी अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे. शर्जील उस्मानी 2019 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा बाबरीशी संबंधित एक फोटो पोस्ट केल्याने चर्चेत आला होता. तसंच उत्तर प्रदेश पोलिसांनी 2019 मध्ये CAA-NRC आंदोलनात त्याला AMU बाहेर झालेल्या गोंधळप्रकरणी अटकही केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ayodhya, Uttar pardesh