सचिन तेंडुलकरची 10 नंबरची 'फेव्हरेट' जर्सीही आता निवृत्त होणार !

सचिन तेंडुलकरची 10 नंबरची 'फेव्हरेट' जर्सीही आता निवृत्त होणार !

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची 10 नंबरची आयकॉनिक जर्सी निवृत्त होणार आहे. 10 नंबरची जर्सी आणि सचिन हे एक समीकरणच झालं होतं. सचिननं मार्च २०१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध अखेरचा सामना खेळला. याशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सचिन 10 क्रमांकाच्या जर्सीतच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

  • Share this:

29 नोव्हेंबर, मुंबई : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची 10 नंबरची आयकॉनिक जर्सी निवृत्त होणार आहे. 10 नंबरची जर्सी आणि सचिन हे एक समीकरणच झालं होतं. सचिननं मार्च २०१२ मध्ये पाकिस्तान विरुद्ध अखेरचा सामना खेळला. याशिवाय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सचिन 10 क्रमांकाच्या जर्सीतच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.

सचिननं आयपीएलमधून निवृती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली होती. मात्र, बीसीसीआयमध्ये असा कोणताही नियम लागू नसल्यामुळे अन्य खेळाडूला या जर्सीसह मैदानात उतरणं सहज शक्य होतं. जर्सीच्या क्रमांकावरुन खेळाडूंमध्ये तुलना आणि वाद होत होता. त्यामुळेच ही 10 नंबरची जर्सी निवृत्त करण्यचा निर्णय बीसीसीआयनं घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 10:58 PM IST

ताज्या बातम्या