'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का?'

रितेश देशमुखला बोलण्याआधी शिवसेनेने स्वत:कडे बघावं. सेना भवनला शिवाजी महाराजांपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मोठा आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जुलै : रितेश देशमुखला बोलण्याआधी शिवसेनेने स्वत:कडे बघावं. सेना भवनला शिवाजी महाराजांपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मोठा आहे. बाळासाहेबांच्या चरणाशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही का? असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

रितेश देशमुख-रवी जाधवचे रायगडावरचे वादग्रस्त फोटो व्हायरल, शिवप्रेमींची टीका

रितेश देशमुख आणि वादाचं जुनं नातं आहे. यावळी तर चक्क शिवाजी महाराजांच्या राजसदरेत बसून त्यांनी फोटो काढलाय आणि इंन्स्टाग्रामवर शेअर केलंय. ज्यामुळे तो नुसता ट्रोल होतोय असं नाही तर टीकेचा धनीही झालाय.

रितेश देशमुखच्या या फोटोंनी शिवप्रेमी कमालीचे संतापलेत. किल्ले रायगडावर राजे शिवाजींच्या राज सदरेतील मेघ डंबरीवर बसून त्यानं फोटो काढलेत. ज्यात कादंबरीकार विश्वास पाटील आणि दिग्दर्शक रवी जाधवही दिसतायतत हे फोटो त्यानं सोशल वेबसाईटवर टाकले आणि टीकेची झोड उडाली.

शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत रितेशवर तोफेचा भडिमार केलाय.

तर रितेशवर हल्ला करणाऱ्या सेनेला काँग्रेसनं धारेवर धरलंय. रितेश देशमुखला बोलण्याआधी शिवसेनेने स्वत:कडे बघावं. सेना भवनला शिवाजी महाराजांपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मोठा आहे. बाळासाहेबांच्या चरणाशी शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. तसंच गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन धर्मियांना बोलण्याआधी स्वत:चा इतिहास आठवावा असा टोलाही सावंत यांनी लगावला.

फोटोंमागे होता फक्त भक्तिभाव, रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी

यापूर्वी 26/11 हल्ल्यानंतर रितेश आणि रामगोपाल वर्माला घेऊन हॉटेल ताजमध्ये जाणं विलासराव देशमुखांना भोवलं होतं. त्यात त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं.आताचं प्रकरण तापल्यानंतर रितेशनं ट्विटरवरून माफी मागितलीय.

रितेशचा माफीनामा

यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंत:करणपूर्वक माफी मागतो.

खरंतर शिवराज्यभिषेक सोहळा आणि शिवजयंती या दिवशीच लोकांना मेघडंबरीपर्यंत जाता येतं..मग आता या कलाकारांना तिथं कसं जाता आला हा मुख्य प्रश्न आहेच.

मेघडंबरीवर सेल्फी काढून अख्ख्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा रितेशनं खरोखरच अपमान केलाय का ?, की शिवरायांच्या किल्ल्यांची दुरवस्था होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणं हा मोठा अपमान आहे?

First published: July 6, 2018, 6:08 PM IST

ताज्या बातम्या