रशियन तरुणीवर मुंबईतील पोलिसाकडून 12 वर्ष बलात्कार, वारंवार केला गर्भपात

रशियन तरुणीवर मुंबईतील पोलिसाकडून 12 वर्ष बलात्कार, वारंवार केला गर्भपात

काम करून देण्याचा बहाण्याने गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला असं पीडित महिलेने तक्रारीमध्ये लिहलं आहे.

  • Share this:

मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी

चेंबूर, 11 ऑक्टोबर : चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने गेली 12 वर्ष आपल्यावर एक पोलीस अधिकारी जबरदस्तीने बलात्कार करत होता अशी तक्रार करण्यात आली. त्याच बरोबर त्याने आपला वारंवार गर्भपात केला असल्याची तक्रार चेंबूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत जवाब नोंदवत त्या पोलीस अधिकार्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

2003 साली व्हिजा वाढवून देण्याच्या बहाण्याने अनिल जाधव या पोलीस अधिकाऱ्याची आपल्याशी ओळख झाली. काम करून देण्याचा बहाण्याने गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला असं पीडित महिलेने तक्रारीमध्ये लिहलं आहे. इतकंच नाही तर आरोपी पोलिसाने त्याच्या मुलाला आणि मलादेखील मारण्याचा प्रयत्न केल्याचं तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपी जाधव याने एका तरुणीचा आणि तिच्या भावाचा खून आपल्या समक्ष केला असून त्याला पुण्यात एका ठिकाणी गाडले असल्याची माहितीही पीडित महिलेने दिली आहे. तर आरोपी अनिल जाधव हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा पती असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी या अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, एका चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचं एक प्रकरण भोपाळमध्ये समोर आलं आहे.

इतर बातम्या - पती आणि लेकीसमोर महिलेचा जागीच मृत्यू, मुंबईमध्ये कंटेनरने चिरडलं!

दोन वेगवेगळ्या सामूहिक बलात्काराच्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथे चिमुकलीला गुंगीचं औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला तर दुसरीकडे मध्य प्रदेशात भोपाळमध्ये 20 वर्षांच्या युवतीवर सफाई कर्मचाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केला. या दोन्ही घटनांमुळे मोठी खळबळ माजली असून पोलिसांकडून दोन्ही प्रकरणी तपास सुरू आहे.

इतर बातम्या - निवडणुकीला 10 दिवस असताना काँग्रेसला मोठा धक्का, या दिग्गजांनी धरला भाजपचा हात!

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथे चिमुकलीवर रेस्टॉरंटमध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बिलासपूर जिल्हा मुख्यालयासमोरील गावातून पीडितेचं अपहरण करून तिला रेस्टॉरंटमध्ये नेण्यात आलं आणि तिथे आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून चिमुकलीवर बलात्कार केला. दरम्य़ान या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून कारवाई करण्यास तयार नसल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला. इतर बातम्या -

इतर बातम्या - मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच भाजपची डोकेदुखी वाढली, युतीत तणाव

पीडित चिमुकलीच्या वडिलांचा आरोप

पीडतेचे वडील नेपाळहून हिमाचल प्रदेशातील बिलासपूर इथे काही वर्षांपूर्वी कामानिमित्तानं आले होते. त्यांना तीन मुली आहेत. 6 ऑक्टोबर रोजी त्यांनी लहान मुलगी घरी न आल्यामुळे त्यांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. रात्र उलटल्यानंतरही मुलीचा पत्ता नाही त्यामुळे त्यांचा जीव कासाविस झाला. वडिलांनी दिलेल्या जबाबानुसार बिलासपूर-चंदीगड रस्त्यावर असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमधील दोन कामगार आणि तरुणाने पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर त्यांनी बलात्कार केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

इतर बातम्या - आज महाराष्ट्रात राजकीय सभांचा धडाका, पाहा तुमच्या शहरात आहे कोणाची सभा?

First published: October 11, 2019, 10:19 AM IST
Tags: rape cases

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading