VIDEO हॉकीच्या मॅचमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तोंडावर पडले

VIDEO हॉकीच्या मॅचमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन तोंडावर पडले

जंगल सफारी, घोड्यांची रपेट, मासेमारी, कराटे असे पुतिन यांचे अनेक छंद आहेत. त्या खेळांचे त्यांचे अनेक फोटोही प्रसिद्ध आहेत. मात्र आजच्या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

  • Share this:

मॉस्को 13 मे : रशियाचे व्लादिमीर पुतिन हे आपल्या धाडसासाठी प्रसिद्ध आहेत. कधी काळी रशियाची गुप्तचर संस्था असलेल्या केजीबीमध्ये ते मोठ्या पदावर होते. खेळ आणि व्यायामाचीही त्यांची आवड जगजाहीर आहे. मात्र एका हॉकी मॅचनंतर मैदानात फिरताना त्यांचा तोल गेला आणि ते तोंडावरच कोसळले. मात्र लगेच त्यांनी स्वत:ला सावरून घेतलं.

अध्यक्ष पुतिन यांच्यासाठी सोची या शहरात हॉकीच्या सद्भावना मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. पुतिन यांचा जनसंपर्क वाढावा यासाठी हा सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात देशताले मान्यवर खेळाडू सहभागी झाले होते. सामना संपल्यानंतर पुतिन हे स्केटिंग करत लोकांना अभिवादन करत होते. ते पुढे जात असतानाच अचानक त्यांचा तोल गेला आणि ते तोंडावर खाली पडले.त्यांच्या शेजारी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना लगेच सावरण्याचा प्रयत्न केला मात्र पुतिन स्वत: उठले आणि सावरून घेतलं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून तो प्रचंड पाहिला जातोय. पुतिन यांना कुठलीही इजा झाली नाही. ते अगदी ठणठणीत आहेत असंही नंतर सांगण्यात आलं.

जंगल सफारी, घोड्यांची रपेट, मासेमारी, कराटे असे पुतिन यांचे अनेक छंद आहेत. त्या खेळांचे त्यांचे अनेक फोटोही प्रसिद्ध आहेत. मात्र आजच्या घटनेमुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कायम फिट आणि जागरुक असणारे पुतिन यांचा तोल गेलाच कसा असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 13, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या