रशिया, 13 जून : आई आपल्या मुलांसाठी कोणतीही हद्द पार करू शकते असं म्हणतात. मुलांसाठी कोणतही बलिदान द्यायला आई तयार असते. पण रशियामध्ये (Raussia News) एका आईचा अत्यंत बेजबाबदार समोर आला आहे. पार्टी करण्यासाठी दोन मुलांना घरात कोंडून आई निघून (Mom did party for four years) गेली. विशेष म्हणजे चार दिवस ती पार्टी करत बसली आणि तिला मुलाचा विचारही आला नाही. घरात भुकेनं व्याकूळ होऊन चिमुरड्यांन प्राणही गमावले.
(वाचा-तलावात बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला जवानानं दिलं जीवदान, VIDEO VIRAL)
रशियामधील 25 वर्षीय ओल्गा बाजरोवा ही महिला ज्लाटाऊस्ट येथील रहिवासी आहे. ओल्गा हिला मित्रांबरोबर पार्टी करायची होती. पण ओल्गाला एक तीन वर्षांची मुलगी आणि 11 महिन्यांचा मुलगा आहे. पण मग पार्टीला गेली तर तिनं या मुलाचं काय केलं हे ऐकूण तुम्हाला धक्का बसेल. मित्रांबरोबर दारु पिण्यासाठी चक्क दोन्ही मुलांनी घरामध्ये कोंडून ही महिला निघून गेली. घरात ही मुलं एकटीच होती त्यांच्याबरोबर दुसरं कोणीही नव्हतं. बरं ही महिला पार्टीला गेली, पण त्यानंतर तीनं जे काही केलं ते अत्यंत धक्कादायक होतं.
(वाचा-बापरे! इंग्रजीतील सर्वात लांब शब्द माहितीये का? वाचायलाच लागतात तब्बल 4 तास)
ओल्गा मित्रांबरोबर पार्टीला गेली आणि त्यानंतर ती सर्व काही विसरून फक्त पार्टीच करत बसली. काही तास वगैरे नव्हे तर तब्बल चार दिवस ती सगळं काही विसरून पार्टी करत होती. चार दिवस तिला मुलांची आठवणही आली नाही. चार दिवसांनी ती घरी आल्यानंतर तिनं पाहिलं तेव्हा तिच्या 11 महिन्यांच्या बाळाचा भुकेनं व्याकूळ होऊन जीव गेला होता. तर तिच्या तीन वर्षाच्या मुलीची अवस्थाही अत्यंत गंभीर होती. पतीपासून विभक्त झालेली असल्यानं ती मुलांबरोबर एकटी राहत होती.
हे सर्व पाहून ती घाबरली आणि तिनं तिच्या आजीला फोन केला. आजीनं ते पाहिल्यानंतर आधी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी ओल्गाला अटक केली आणि मुलीला लगेचच रुग्णालयात दाखल केलं. न्यायालयात या प्रकरणी सुनावणीदरम्यान महिलेनं या घटनेबाबत पश्चात्ताप व्यक्त केला. पण मुलांना मारण्याचा हेतू नव्हता तर नकळत हे सगळं घडलं असं ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.