Home /News /news /

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या एक्स पत्नीने थाटलाय नवा संसार, नवरा आहे 20 वर्षांनी लहान

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या एक्स पत्नीने थाटलाय नवा संसार, नवरा आहे 20 वर्षांनी लहान

Lyudmila and putin

Lyudmila and putin

युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) हे जगभर खलनायक आणि हुकूमशहा बनले आहेत. या युद्धाच्या निषेधार्थ, पुतीन यांची एक्स पत्नी ल्युडमिला(Lyudmila Aleksandrovna Ocheretnaya) देखील अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत ज्या आता फ्रान्समधील एका आलिशान राजवाड्यात आलिशान जीवन जगत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 11 मार्च: युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन(Vladimir Putin) हे जगभर खलनायक आणि हुकूमशहा बनले आहेत. या युद्धाच्या निषेधार्थ, पुतीन यांची एक्स पत्नी ल्युडमिला(Lyudmila Aleksandrovna Ocheretnaya) देखील अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत ज्या आता फ्रान्समधील एका आलिशान राजवाड्यात आलिशान जीवन जगत आहे. पुतिन यांच्या एक्स पत्नीने दुसरे लग्न केले आहे. पुतिन यांनी पत्नी ल्युडमिला यांना घटस्फोट दिला. त्यानंतर पुतिन यांनी दुसरे लग्न केले नाही परंतु त्यांची पत्नी ल्युडमिला यांनी स्वतःहून 20 वर्षांनी लहान असलेल्या रशियन व्यावसायिकाशी लग्न केले. आता त्या त्याच्यासोबत फ्रान्समध्ये एका आलिशान बंगल्यात राहतात. भव्य मिनी पॅलेस आहे, जिथे ल्युडमिला त्यांच्या 21 वर्षांनी लहान असलेला पता आर्थरसोबत राहतात. हा बंगला फ्रेंच समुद्रकिनारी असलेल्या रिबिट्झ शहरात आहे, जिथे फक्त श्रीमंत लोक राहतात. या शहराला रिसॉर्ट्सचे शहर म्हटले जाते. जगभरातील पैसा असलेल्या लोकांचे बंगले येथे आहेत. ल्युडमिला म्हणजेच पुतीन यांच्या माजी पत्नीच्या नावाने खरेदी केलेला हा बंगला केवळ आलिशानच नाही तर त्याची किंमतही खूप आहे. पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला तेव्हा फ्रान्समधील ल्युडमिला यांच्या अलिशान बंगल्यासमोर नागरिकांना आंदोलन केले होते. त्यांनी त्यांच्या बाहेरील भिंतीवर पुतिन यांच्याविरोधात लिहले होते. ल्युडमिला या 64 वर्षांच्या आहेत. तर त्यांचा पति आर्थर ओचेरतनी 44 - 45 वर्षांचा आहे. आर्थरचा जन्म 1978 मध्ये झाला आणि त्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्याने व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय पक्षासाठी आणि इतर अनेक कंपन्यांसाठी पार्टी आयोजित करणाऱ्या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. याआधी त्यांनी मॉस्को येथील एज्युकेशन पब्लिकेशनमध्येही काम केले आहे. आता ते मोठे उद्योगपती आहेत. आर्थर आणि ल्युडमिला यांनी 2016 मध्ये गुपचूप लग्न केले होते म्हणजेच त्यांच्या लग्नाला 06 वर्षे झाली आहेत. जरी आर्थरशी संबंधित सूत्रांनी दावा केला की लग्न प्रत्यक्षात 2015 मध्ये झाले होते, तर पुतिन आणि त्यांची पत्नी ल्युडमिला यांचा घटस्फोट झाला होता. रशियामध्ये पुतिन यांच्या पत्नीने नावामागील आडनाव बदलल्यानंतर लोकांना त्यांच्या लग्नाबद्दल माहिती मिळाली. ल्युडमिला यांनी पुतीन यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्या वेळी त्या एअरोफ्लो एअरलाइन्समध्ये हवाई सुंदरी होत्या. एका मैत्रिणीमार्फत पुतीन यांची भेट झाली. त्यावेळीपुतीन लेनिनग्राड येथील रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या मुख्यालयात काम करत होते. दोघांनी तीन दिवस एकत्र घालवले. पुतीन यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्या भारावल्या होत्या. तीन वर्षांनंतर पुतीन यांनी ल्युडमिला यांना प्रपोज केले. पुतीन म्हणाले, ल्युडमिला यांनी त्यांच्याशी लग्न केले नाही, तर आयुष्यभर अविवाहित राहू. 28 जुलै 1983 रोजी ल्युडमिला यांनी प्रस्ताव स्वीकारला. मात्र पुतीन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दोघांच्याही विभक्त होण्याच्या चर्चा सुरू झाल्या. अखेरीस दोघांनी 2014 मध्ये अधिकृतपणे सांगितले की ते घटस्फोट घेत आहेत. यानंतर ल्युडमिलाच्या आर्थरशी भेटीगाठी वाढल्या. कदाचित तो ल्युडमिलाला त्या दिवसांपासून ओळखत असेल जेव्हा तिची कंपनी पुतीनसाठी पार्टी आयोजित करत असे. त्यानंतर पुतिन यांच्याशी आर्थरचा संपर्क वाढला आणि त्यांच्या पक्षात सामील झाले. 2014 पासून, ल्युडमिला आणि आर्थरची भेट वाढली. ती त्यांना आवडली. आर्थर आता रशियाचा मोठा उद्योगपती झाला आहे. फ्रान्समध्ये राहतात. त्यांच्या नावावर अनेक प्रकारचे व्यवसाय असल्याचे सांगितले जाते.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Russia Ukraine, Russia's Putin

    पुढील बातम्या