लष्करी सैनिकाने साथीदारांवरच केला अंदाधुंद गोळीबार, 8 जवानांचा मृत्यू

लष्करी सैनिकाने साथीदारांवरच केला अंदाधुंद गोळीबार, 8 जवानांचा मृत्यू

तब्बल आठ जवानांचा मृत्यू झाला आहे तर 2 जवान गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

मास्को (रशिया),  26 ऑक्टोबर : एका लष्करी बसवर सैनिकांनेच गोळीबार करून यात आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी एका रशियन सैनिकाने लष्करी बसमध्ये असलेल्या त्याच्याच साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये तब्बल आठ जवानांचा मृत्यू झाला आहे तर 2 जवान गंभीर जखमी झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सैनिकाची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याने हे पाऊल उचलले. रामिल शाम्सुतदिनोव (20)असं गोळीबार करणाऱ्या सैनिकाचं नाव आहे. रामिल याने अचानक आपल्या साथीदारांच्या बसवर गोळीबार केला. यामध्ये आठ तरुण सैनिकांनी आपला जीव गमावला आहे. या संपूर्ण प्रकरणात रशियन पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

आरोपी सैनिकाची मानसिक स्थिती नव्हती ठीक!

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सैनिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याची मानसिक प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याने असा धक्कादायक प्रकार केला. आरोपी जवानाचं लष्करी कामातही सामंजस्य नव्हतं. तर आरोपीने केलेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या जवानांवर उपचार सुरू असल्याची माहितीही संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - भावी मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरनंतर आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेचा नवा फंडा, मुंबईत लागले नवे बॅनर!

अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळई उप-संरक्षण मंत्री एंद्रेई कार्तापोलोव यांच्या अध्यक्षतेखाली आयोग बैठकीचं आयोजन करण्यात आली होतं. या सगळ्याची माहिती मिळाल्यानंतर आता रशियन पोलीस घटनेचा तपास करत आहेत. तर ताब्यात घेतलेल्या आरोपी सैनिकाची आरोग्य चाचणीही करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या