News18 Lokmat

भाजप खासदार रुपा गांगुली यांच्या घरावर प. बंगाल सीआयडीची धाड

भाजप खासदार रुपा गांगुली घरावर पश्चिम बंगाल सरकारच्या सीआयडी पोलिसांनी धाड टाकलीय. मानवी तस्करी प्रकरणात रुपा गांगुली यांचं नाव पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2017 02:30 PM IST

भाजप खासदार रुपा गांगुली यांच्या घरावर प. बंगाल सीआयडीची धाड

कोलकाता, 29 जुलै : भाजप खासदार रुपा गांगुली घरावर पश्चिम बंगाल सरकारच्या सीआयडी पोलिसांनी धाड टाकलीय. मानवी तस्करी प्रकरणात रुपा गांगुली यांचं नाव पुढे आल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भात स्थानिक सीआयडीने रुपा गांगुली यांना नोटीसही पाठवली होती. चाईल्ड ट्रफिकिंग रॅकेटसंबंधी रुपा गांगुली यांची चौकशी करण्यासाठी ही कारवाई होतेय. याच प्रकरणात भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचीही देखील चौकशी होणार आहे.

या चाईल्ड ट्रफिकिंग रॅकेटमधील मुख्य आरोपी चंदना चक्रवर्ती आणि जुही चौधरी यांनी पोलीस चौकशीदरम्यान रुपा गांगुलीचं घेतलं होतं. त्यानंतर रुपा गांगुली यांना प्रदेश भाजपच्या महिला अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. कधीकाळी महाभारत सिरियल्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या रुपा गांगुली गेल्या वर्षीच भाजपतर्फे राज्यसभेवर गेल्या होत्या. तेव्हापासून त्या सातत्याने चर्चेत असतात. मध्यंतरीही त्यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारची ही कारवाई वैयक्तिक आकसापोटीच होत असल्याचा आरोप भाजप खासदार रुपा गांगुली यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 02:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...