मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /कोरोनातून वाचवण्यासाठी म्हणे आल्या आहेत 2 पऱ्या; नियमांचे तीन-तेरा वाजवत जमली गर्दी

कोरोनातून वाचवण्यासाठी म्हणे आल्या आहेत 2 पऱ्या; नियमांचे तीन-तेरा वाजवत जमली गर्दी

कोरोनापासून वाचवण्यासाठी गावात दोन पऱ्या आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. कोरोनामुळं हैराण असलेल्या लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवत त्या पऱ्यांकडं जाण्याचा निर्णय घेतला.

कोरोनापासून वाचवण्यासाठी गावात दोन पऱ्या आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. कोरोनामुळं हैराण असलेल्या लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवत त्या पऱ्यांकडं जाण्याचा निर्णय घेतला.

कोरोनापासून वाचवण्यासाठी गावात दोन पऱ्या आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली. कोरोनामुळं हैराण असलेल्या लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवत त्या पऱ्यांकडं जाण्याचा निर्णय घेतला.

राजगड, 3 जून : कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) संपूर्ण जगात भीतीचं वातावरण आहे. या गंभीर आजारावर अद्याप कोणाकडंही खात्रीशीर औषध नाही. भारतासह जगात सर्वत्र लसीकरण (Corona Vaccination) करण्यात येत आहे. कोरोना लसीकरण हाच यावरील सध्या चांगला उपाय आहे. कोरोना विषाणूला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी सुरक्षित अंतर राखणं, मास्क वापरणं, असे नियम पाळणे गरजेचे आहे. याबाबत प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत असली तरी अद्यापही काही ठिकाणी कोरोनाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनापासून वाचवण्यासाठी गावात दोन पऱ्या आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली.

कोरोनामुळं हैराण असलेल्या लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवत त्या पऱ्यांकडं जाण्याचा निर्णय घेतला. गावातील दोन महिलांच्या अंगात पऱ्या आल्या आहेत. या पऱ्यांच्या हातून कोणीही आपल्या अंगावर पाणी शिंपडवून घेतल्यास त्या व्यक्तीला कोरोना होणार नाही, अशी अफवा गावात जोरात पसरली. त्यामुळे गावातील लोक यावर विश्वास ठेवून घरातून बाहेर पडत एकत्र जमले. या प्रकारामुळे गर्दी तर झालीच आणि घटनास्थळी लोकांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे अजिबात पालन केल्याचे दिसले नाही. या पर्‍यांना भेटण्यासाठी गावातील लोक एका मंदिराबाहेर जमले होते. हा सर्व प्रकार मध्य प्रदेशच्या राजगड येथे घडला. कोरोनापासून वाचवण्यासाठी पृथ्वीवर दोन पऱ्या आल्या आहेत, ही अफवा जोरात पसरली होती.

हे वाचा -पुण्यात कोरोनाच्या भीतीपोटी शेकडो अस्थिकलश स्मशानभूमीतच धुळखात पडून...!

गावात घडलेल्या या धक्कादायक प्रकाराची माहिती नंतर पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी गावात येऊन अशाप्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन लोकांना केलं. कोणत्याही अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, सर्वांना कोरोनाचे नियम पाळत घरला जाण्यास सांगितले. त्यानंतर या संबंधित अंगात दोन पऱ्या अवतरलेल्या महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Coronavirus, Madhya pradesh