मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

RTI कार्यकर्ते विलास बारवकरांनी केली आत्महत्या

RTI कार्यकर्ते विलास बारवकरांनी केली आत्महत्या

RTI vilas25 मार्च :  RTI कार्यकर्ते विलास बारवकर यांनी आज सकाळी 7.30 वाजता चाकण इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये 100 रुपयांच्या स्टॅम्पवर, परिसरातील 40 राजकीय नेते आणि पोलीस अधिकार्‍यांची नावं आहेत.

'या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी यात लिहिल आहे. माझ्या आत्महत्येला सर्वांना जबाबदार धरा असंही त्यांनी यात लिहिलं आहे.'

चाकण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टेम सुरू आहे. याबाबत अजून कोणावरीह गुन्हा दाखल झालेला नाही.

First published:

Tags: RTI, Suicide