RRB Group D exam result 2019: मुंबईमध्ये रेल्वे भरतीचा अंतिम निकाल जाहीर, पाहा इथे

RRB Group D exam result 2019: मुंबईमध्ये रेल्वे भरतीचा अंतिम निकाल जाहीर, पाहा इथे

रेल्वे भरतीसाठी देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्याचे निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. रेल्वे विभागाने मुंबईपासून निकाल जारी करण्यात सुरुवात केली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 मार्च : RRB Group D exam result 2019 LIVE: रेल्वे भरती विभागाकडून मुंबई आणि बिलासपूरमधील निकाल हे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहेत. अनेक विद्यार्थी या वेबसाईटवर आपले निकाल तपासत असल्यामुळे ही वेबसाईट वारंवार हँग होत आहे. पण या सगळ्यावर गोंधळून न जाता थोड्या वेळाने पुन्हा वेबसाईटवर लॉग इन करा आणि तुमचे निकाल पाहा.

रेल्वे भरतीसाठी देशभरातून अनेक विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. त्याचे निकाल लागण्यास आता सुरुवात झाली आहे. रेल्वे विभागाने मुंबईपासून निकाल जारी करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे खाली दिलेल्या वेबसाईटवरून तुम्ही संबंधित निकाल पाहू शकता.

रेल्वे भरतीचा मुंबईतील निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

कसा पाहाल ऑनलाईन निकाल...

- ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी उमेदवाराकडे त्याचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर असणं महत्त्वाचं आहे.

- निकाल पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल.

- लॉग इन केल्यानंतर तुमचा रोल नंबर आणि रजिस्‍ट्रेशन नंबर टाकून तुम्ही निकाल पाहू शकता.

रेल्वे भरतीचा बिलासपूरचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा...

निकाल हाती आल्यानंतर पुढील प्रक्रिया

- जर विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये पास झाला असेल. तर त्यांना शारिरीक चाचणी द्यावी लागेल. ज्याला फिजिकल एंड्योरेंस टेस्ट (पीईटी)असं म्हणतात.

- त्यानंतर ग्रुप डी च्या 60 हजार पेक्षा जास्त पदांसाठी भरती उमेदवारांची भरती करण्यात येईल.

RRB वेबसाइट्स

अहमदाबाद www.rrbahmedabad.gov.in

अजमेर www.rrbajmer.gov.in

इलाहाबाद www.rrbald.gov.in

बेंगळुरू www.rrbbnc.gov.in

भोपाळ www.rrbbpl.nic.in

भुवनेश्‍वर www.rrbbbs.gov.in

बिलासपुर www.rrbbilaspur.gov.in

चेन्‍नई www.rrbchennai.gov.in

चंडीगढ़ www.rrbcdg.gov.in

गोरखपुर www.rrbgkp.gov.in

गुवाहाटी www.rrbguwahati.gov.in

जम्‍मू www.rrbjammu.nic.in

कोलकाता www.rrbkolkata.gov.in

मालदा www.rrbmalda.gov.in

मुंबई www.rrbmumbai.gov.in

मुजफ्फरपूर www.rrbmuzaffarpur.gov.in

पटना www.rrbpatna.gov.in

रांची www.rrbranchi.gov.in

सिकंदराबाद www.rrbsecunderabad.nic.in

सिलीगुढी www.rrbsiliguri.org

तिरुवनंतपुरम www.rrbthiruvanthapuram.gov.in

RRB ग्रुप डी शारीरिक दक्षता परीक्षा (पीईटी):

या परीक्षेमध्ये उमेदवाराला शारिरीक क्षमतेची चाचणी द्यावी लागेल. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी योग्य ते मानदंड देण्यात आले आहेत.

VIDEO: 'ही' अट पूर्ण केली तरच जमा होतील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये

First published: March 4, 2019, 5:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading