Home /News /news /

ट्रेनमध्ये बाळाला रडताना पाहून फुटला मायेचा पाझर, महिला ASI ने घरा जाऊन आणली दुधाची बाटली

ट्रेनमध्ये बाळाला रडताना पाहून फुटला मायेचा पाझर, महिला ASI ने घरा जाऊन आणली दुधाची बाटली

एका चार महिन्यांच्या नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. एक आई तिच्या बाळा घेऊन रेल्वेच्या बोगीमध्ये उभी होते. तिच्याकडे बाळाला खायला घालण्यासाठी काहीही नव्हतं.

    रांची, 14 जून : कोरोनाच्या या कठीण काळात माणूसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. बेंगळुरूहून गोरखपूरला जाणारी श्रमिक स्पेशल रेल्वे ही पहाटे सहाच्या सुमारास हटिया स्टेशनवर थांबते. बरेच लोक काही सामान घेण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरतात. यावेळी एका चार महिन्यांच्या नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. एक आई तिच्या बाळा घेऊन रेल्वेच्या बोगीमध्ये उभी होते. तिच्याकडे बाळाला खायला घालण्यासाठी काहीही नव्हतं. या सगळा प्रकार पाहिल्यानंतर आरपीआयची एएसआय सुशीला या ताबडतोब स्कूटीवरून घरी गेल्या आणि त्यांनी मुलासाठी गरम दुधाची बाटली घेऊन स्टेशनवर पोहोचल्या. त्यांनी बाळाला दूध पाजलं आणि तेव्हा कुठे बाळ शांत झालं. सुशीला यांच्या या कामामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतूक होत आहे. त्यांच्या या मायेला खरंतर सलाम. सुशांतच्या आई आणि बहिणीचं आधीच झालं होतं निधन, मोलकरणीने दिली धक्कादायक माहिती आईने सांगितलं बाळा दुध नाही रेल्वे प्लाटफॉर्मवर येताच बाळाची आई त्याला घेऊन बाहेर आली. बाळाला दूध नसल्यामुळे ते मोठ्याने रडत होतं. दरम्यान, ड्युटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) महिला एएसआय सुशीला बडिके यांना आईने बाळाला दूध नाही. तुम्ही आणून द्याल का अशी विनंती केली. यावर सुशीला ताबडतोब घरी गेल्या आणि बाळासाठी दूध आणलं. बाळा दूध मिळाल्यानंतर ते शांत झालं आणि मस्त खेळू लागलं. यानंतर आईने सुशीला यांचे आभार मानले. आपला देश असा संकटात असताना हेच खरे कोरोनाचे योद्धा आहे जे प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहेत. क्वारंटाईन सेंटरमध्ये नातेवाईकांनी पुरावल्या दारूच्या बाटल्या, अशी रंगली पार्टी संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या