VIDEO : आजीबाईंचा Rowdy Baby गाण्यावर भन्नाट डान्स

VIDEO : आजीबाईंचा Rowdy Baby गाण्यावर भन्नाट डान्स

सोशल मीडियावर एका आजीबाईंचा VIDEO सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पुदुचेरीच्या (Puducherry)नायब राज्यपाल किरण बेदी (Kiran Bedi) यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. एका आजीबाईंचा डान्स करतानाचा हा Video आहे.

  • Share this:

पुदुचेरी,15 जानेवारी : सोशल मीडियावर एका आजीबाईंचा VIDEO सध्या प्रचंड व्हायरल होतोय. पुदुचेरीच्या (Puducherry)नायब राज्यपाल किरण बेदी (Kiran Bedi) यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. एका आजीबाईंचा डान्स करतानाचा हा Video आहे. या Video मध्ये त्या आजीबाई भन्नाट डान्स करताना दिसतायत. साडीवर शर्ट घातलेल्या आजीबाईंच्या डान्सचा तिथे बसलेल्या इतर महिलाही आनंद घेताना दिसतायत. या व्हीडिओमध्ये दिसत असलेल्या महिला या पालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आहेत. या सर्व महिला पोंगल उत्सव साजरा करत असताना हा व्हीडिओ रिकोर्ड करण्यात आलाय. मंगळवारी किरण बेदी नगर निगम च्या कर्मचाऱ्यांसोबत पोंगल उत्सव साजरा करत होत्या आणि त्याचवेळी तिथल्या डान्स करणाऱ्या महिलेचा त्यांनी व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ किरण बेदी यांनी त्यांच्या ट्विटर हॅन्डलवर देखील शेअर केलाय. किरण बेदी यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ बघुन तुमच्या चेहऱ्यावरही हास्य फुलेल.

'राउडी बेबी' गाण्यावरचा डान्स पाहुन लोक म्हणाले 'सुपर अम्मा'

व्हिडिओमधल्या साडीवर गुलाबी रंगाचा शर्ट घातलेल्या या आजीबाई आनंद घेऊन नाचत आहेत. दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेता धनुष च्या 'राउडी बेबी' या गाण्यावर त्यांनी मस्त डान्स केलाय. हा व्हिडीओ आतापर्यंत 24 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला. त्यावर खूप साऱ्या प्रतिक्रियाही आल्या आहेत.काहींनी तर हा व्हिडीओ बघून डान्स करणाऱ्या आजीबाईंना 'सुपर अम्मा' असं म्हटलय.

(हेही वाचा:'सलमान खान'ने भाचीला घेतलं कुशीत,अर्पिताने शेअर केला PHOTO)

तिथेच काहींनी हा व्हिडीओ बघुन आम्हाला खूप आनंद झाला, असं म्हटलंय. सोबतच किरण बेदी यांनी या उत्सवाचे आणखी काही फोटोही शेअर केले आहेत.पोंगल उत्सवानिमित्त पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वरूपात साडी देण्यात आली. एकूण 4 दिवस सुरू राहणारा हा उत्सव आज मकरसंक्रातीपासून सुरू झाला आहे. तामिळनाडूमध्ये सर्व महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक असा हा उत्सव आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: January 15, 2020, 6:37 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading