फूटबॉलपटू रोनाल्डिनो, डिक्को सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...अमित ठाकरेही उपस्थित

फूटबॉलपटू रोनाल्डिनो, डिक्को सिद्धीविनायकाच्या दर्शनाला...अमित ठाकरेही उपस्थित

सुप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डीनो आणि डिक्को यांनी आज सिद्धीविनायक मंदिरात बाप्पांचं दर्शन घेतलं. याप्रसंगी अमित ठाकरेही उपस्थित होते. डिक्को यांनी भावना व्यक्त करताना आपल्याला भारत देश आणि या देशाची संस्कृती खूप आवडत असल्याच्या भावना व्यक्त केली. मुंबईतल्या प्रीमियर फुटसाल लीगसाठी रोनाल्डिनो मुंबईत आलेत.

  • Share this:

 

मुंबई, 15 सप्टेंबर : सुप्रसिद्ध फुटबॉलपटू रोनाल्डीनो आणि डिक्को यांनी आज सिद्धीविनायक मंदिरात बाप्पांचं दर्शन घेतलं. याप्रसंगी अमित ठाकरेही उपस्थित होते. डिक्को यांनी भावना व्यक्त करताना आपल्याला भारत देश आणि या देशाची संस्कृती खूप आवडत असल्याच्या भावना व्यक्त केली. मुंबईतल्या प्रीमियर फुटसाल लीगसाठी रोनाल्डिनो मुंबईत आलेत.

जागतिक फुटबॉल दिवसाच्या निमित्तानं आज मुंबई फुटबॉलमय झाली होती. एकिकडे राज्य सरकारचा उपक्रम तर दुसरीकडे मुंबईत प्रिमियर फुटसाल लिगचं आयोजन. त्यामुळे जागतिक किर्तीचे फुटबॉल खेळाडू ही मुंबईत एकवटले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या फुटबॉल प्रेमींना एक नामी संधी चालून आली ती आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहण्याची आयती संधी चालून आलीय.

राज ठाकरे यांचे चिंरजीव अमित ठाकरे सुद्धा फूटबॉलचे मोठे चाहते आहेत. काल या सगळ्या खेळाडूंचं आगमन मुंबईत झालं. तेंव्हाही अमित ठाकरे या सर्वांच्या स्वागतासाठी आवर्जून उपस्थित होते. ही तीन दिवसीय स्पर्धा मुंबईच्या वरळीत परिसरातील एनएसआयमध्ये भरणार असून या तीन दिवसीय स्पर्धेसाठी फुटबॉलप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2017 08:27 PM IST

ताज्या बातम्या