S M L

भावाला राखी देऊन परतताना महिलेचा खून, करणी करते म्हणून डोक्यात घातला रॉड

बिहाच्या रोहतास जिल्ह्यामध्ये एका ५० वर्षांच्या महिलेचा बुधवारी भर रस्त्यात खून करण्यात आला आहे.

Updated On: Aug 24, 2018 05:16 PM IST

भावाला राखी देऊन परतताना महिलेचा खून, करणी करते म्हणून डोक्यात घातला रॉड

बिहार, 24 ऑगस्ट : बिहाच्या रोहतास जिल्ह्यामध्ये एका ५० वर्षांच्या महिलेचा बुधवारी भर रस्त्यात खून करण्यात आला आहे. उगराबीघा गावातील ही घटना असून कमला देवी असे मृत महिलेचे नाव आहे. या महिलेने जादूटोना केला असा आरोप करत नराधमांनी तिच्यावर लोखंडाच्या रॉडने वार केले. या लोखंडाचे वार इतके तीव्र होते की महिलेने जागीच आपले प्राण सोडले.

मिळालेल्या माहितीनूसार मृत महिला बनौली गावची रहिवाशी दिनेश सिंह यांची पत्नी होती. आपल्या भावाला राखी देऊन परतत असताना तिच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. मृत महिलेच्या वहिनीने (अंतरा देवी) दिलेल्या जबाबावरून एफआयआरची नोंद करण्यात आली आहे अशी माहिती एसपी सत्यवीर सिंह यांनी दिली आहे. त्यानूसार कमला देवी ही रक्षाबंधनसाठी भावाला राखी देण्यास तिच्या माहेरी गेली होती. तिचा भाऊ नंदजी यादव हा गंगोली गावात राहतो. कमला देवी परत तिच्या सासरी जाताना तिची वहिनी अंतरा देवी ही तिला गावाच्या वेशीपर्यंत सोडायला आली होती.

BIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या?

जेव्हा अंतरा तिला सोडायला आली तेव्हाच तिला गंगौली गावातील अजय सिंह, सुरेश सिंह, वशिष्ठ सिंह आणि विपिन सिंह लोहे हे चौघे दिसले. हातात रॉड आणि काठी घेऊन ते कमला देवीचा पाठलाग करत तिला मारहाण करत होते. अंतराने काही करण्याआधीच त्या चौघांनी तिच्या डोक्यात रॉड घातला आणि तिचा जीव घेतला.

घटना घडताच आरोपींनी तिथून पळ काढला. अंतराने कमलाला तात्काळ रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. डोक्यात रॉड लागल्याने रक्तस्त्राव जास्त झाला होता त्यामुळे कमलाचा जागीच मृत्यू झाला.

Loading...

दरम्यान, आपल्या कुटुंबावर कमला जादूटोना करत असल्याच्या संशयावरून अजय सिंह याने कमलाचा जीव घेतला असा जबाब अंतराने पोलीस ठाण्यात नोंदवला आहे. त्यामुळे पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहे.

 

रेल्वे प्रवासी लक्ष द्या, प्रवासात चुकूनही कोणाला सांगू नका 'या' गोष्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2018 05:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close