बापाने झाडल्या मुलीवर गोळ्या, सब इंस्पेक्टरचाही मृत्यू

बापाने झाडल्या मुलीवर गोळ्या, सब इंस्पेक्टरचाही मृत्यू

  • Share this:

रोहतक, 08 ऑगस्ट : रोहतकच्या पोलीस उप मुख्यालयाबाहेर बुधवारी एका अल्पवयीन मुलीची आणि तीला घेऊन आलेल्या पोलीस उप निरीक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात मृत पावलेला उप निरीक्षक नरेंद्र हा करनालचा, तर अल्पवयीन मुलगी रोहतकच्या हिसार रोड भागात राहत होती. घरच्यांच्या विरोधात जाऊन मुलीने प्रेमविवाह केला होता. मुलीच्या बापानेच तीच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. ज्यात दोघांचे निष्कारण प्राण गेले.

मृत पावलेल्या अल्पवयीन मुलीने सिंहपुरा च्या समीन उर्फ सोमी याच्याशी प्रेमविवाह केला होता. ती अल्पवयीन असल्यामुळे तीच्याशी लग्न करणाऱ्या युवकाला पोलिसांनी जेरबंद केलयं. तर मुलीला नारी निकेतन मध्ये ठेवण्यात आले होते. बुधवाही त्या मुलीची साक्ष नोंदविण्यासाठी उप निरीक्षक नरेंद्र हा तीला करनालच्या नारी निकेतन मधून घेऊन आला होता.

पोलीस उप मुख्यालयासमोर पोहोचताच अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यात मुलीला दोन, तर तीला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीस उप निरीक्षकास तीन गोळ्या लागल्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता अशी माहिती आहे. मुलीच्या वडीलांवर हत्येचा आरोप आहे.

हेही वाचा..

...तर मुंबईतला 2 किलोमीटरचा परिसर होऊ शकतो उद्‌ध्वस्त

आंबोली घाटात ट्रक दरीत कोसळला

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बळीराजाची फसवणूक; परस्पर काढलं शंभर कोटींचं कर्ज

First published: August 8, 2018, 10:31 PM IST

ताज्या बातम्या