अहमदनगर, 1 ऑक्टोबर: राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपला जोरदार दणका दिला आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातील भाजपचे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सहभागी झाले आहे. त्यात कर्जतमधील 3 तर जामखेडमधील 2 भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. जामखेड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर यांच्यासह भाजपच्या तीन नगरसेवकांनी माजी मंत्री राम शिंदे यांची साथ सोडत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
हेही वाचा...आपण नक्की जिंकू...आत्महत्या हा पर्याय नाही, संभाजीराजेंचं मराठा तरुणांना आवाहन
मागील चार वर्षांपासून जामखेड नगरपरिषदेमध्ये भाजपचे सहयोगी सदस्य असलेल्या तीन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे. त्यामुळे भाजपला कर्जत पाठोपाठ जामखेड येथे गळती लागली आहे.
येथील विश्रामगृहावर कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुर्यकांत मोरे, तालुका उपाध्यक्ष दयानंद कथले, सतिष चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला.
यावेळी बोलताना नगरसेवक महेश निमोणकर म्हणाले मी अपक्ष निवडून येऊन भाजपला विनाशर्थ पाठींबा दिला होता. वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मी माजी मंत्री राम शिंदे यांचे काम केले होते तरीही भाजपवाले मला त्यांचा समजत नव्हते तसेच शहराचा खुंटलेला विकास यामुळे प्रमुख कार्यकर्ते यांच्या बरोबर चर्चा करून राष्ट्रवादीचे उदयोन्मुख नेतृत्व आ. रोहीत पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ संघाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, आ. रोहीत पवार यांनी मतदारसंघात जनतेला विश्वासात घेऊन आपले कार्य चालू केले आहे तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने पक्षाचे बळ निश्चित वाढत आहे आ. रोहीत पवार यांच्यावर या तीन नगरसेवकांनी टाकलेल्या विश्वासाला पक्ष स्वागत करतो लवकरच आ. रोहीत पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.
हेही वाचा..चिमुकल्याच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला! 10 महिन्यांच्या मुलाचं अपहरण करून हत्या
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या कार्य पद्धतीवर फिदा होत कर्जत नगरपंचायतीच्या विद्यमान दोन नगरसेवकांसह पाच जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. भाजपचे नगरसेवक बापुसाहेब नेटके, नगरसेविका मनीषा सोनमाळी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सतीष पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी, डॉ. प्रकाश भंडारी आदींचा यामध्ये समावेश आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन धांडे यांनी या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले. यावेळी सुनील शेलार, दादासाहेब थोरात, भास्कर भैलुमे, रवि पाटील आदी उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे प्रवेश करण्यात आणखी प्रवेश आपल्या पक्षात होणार आहेत असे बापूसाहेब नेटके यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit pawar