जे पेराल ते उगवेल, रोहित पवारांची भाजपवर जळजळीत टीका!

जे पेराल ते उगवेल, रोहित पवारांची भाजपवर जळजळीत टीका!

'भारतीय जनता पक्षाच काम पाहून शिवसेनेचे नेते कधी राजीनामा देतात याची वाट शिवसैनिक पहात होते मात्र सत्तेच्या स्वार्थासाठी सेना भाजपा एकत्र आले.'

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : अमळनेरमध्ये भाजपच्या जाहीर सभेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी माजी आमदाराला बेदम मारहाण केली. सध्या सगळीकडे याची चर्चा सुरू असताना आता विरोधकांनीही या मुद्द्याला लक्ष केलं आहे. भाजपच्या या प्रसंगावर टीका करत रोहित पवार यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.

फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले रोहित पवार...

'जे पेराल ते उगवेल. गेली साडेचार वर्ष सत्तेत एकत्र राहून देखील भाजप आणि शिवसेनेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. भारतीय जनता पक्षाच काम पाहून शिवसेनेचे नेते कधी राजीनामा देतात याची वाट शिवसैनिक पहात होते मात्र सत्तेच्या स्वार्थासाठी सेना भाजपा एकत्र आले.

पण लोकांच काय? पक्षासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांच काय? हे प्रश्न ज्या पक्षाला पडत नाहीत त्याच पक्षासोबत असा प्रकार घडण्याची वेळ येते. अन्यायाची भाषा कार्यकर्त्यांना चांगलीच समजते म्हणूनच हा प्रकार भाजपच्या नेत्यांना सहन करावा लागतोय. वातावरण पहाता हाच प्रकार राज्यातल्या ठिकठिकाणी घडण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही.'

भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण

अमळनेरमध्ये भाजपच्या जाहीर सभेत गिरीश महाजन यांच्यासमोर पदाधिकाऱ्यांनी माजी आमदाराला बेदम मारहाण केली. बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि माजी आमदार बी.एस.पाटील यांच्यात शाब्दीक चकमक सुरू असतांना हाणामारीत रूपांतर झालं.

यावेळी कार्यकर्त्यांनी अक्षरश: बुटाने पाटील यांना मारहाण केली. कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की, महाजनांनी अक्षरश: कार्यकर्त्यांना स्टेजवरून खाली ढकलून दिलं. यावेळी व्यासपीठावर सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना आणि भाजप पदाधिकारी यांनी माजी आमदार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला.

एकीकडे हा गोंधळ सुरू होता तर दुसरीकडे 'स्मिता वाघ आगे बढो', अशा घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या या सभेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. तर आता विरोधकही या मुद्द्यावर जोरदार टीका करत आहेत.

VIDEO : त्यावेळी नेमकं काय घडलं? गिरीश महाजनांचा खुलासा

First published: April 10, 2019, 9:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading