बांग्लादेश सरकार रोहिंग्याची नसबंदी करणार !

मान्यमारमधून बांग्लादेशात आश्रयाला आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रित राहावी, यासाठी बांग्लादेश प्रशासनाने चक्क त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. बांग्लादेशात 10 लाखांच्यावर रोहिंग्या मुस्लिमांनी विविध छावण्यांमधून आश्रय घेतलाय. पण त्यांच्यातील मागासलेपणामुळे त्यांच्या लोकसंख्यावाढीवर कोणतंही नियंत्रण नाहीये.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 28, 2017 06:46 PM IST

बांग्लादेश सरकार रोहिंग्याची नसबंदी करणार !

ढाका, 28 ऑक्टोबर : मान्यमारमधून बांग्लादेशात आश्रयाला आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची लोकसंख्या नियंत्रित राहावी, यासाठी बांग्लादेश प्रशासनाने चक्क त्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. बांग्लादेशात 10 लाखांच्यावर रोहिंग्या मुस्लिमांनी विविध छावण्यांमधून आश्रय घेतलाय. पण त्यांच्यातील मागासलेपणामुळे त्यांच्या लोकसंख्यावाढीवर कोणतंही नियंत्रण नाहीये.

बांग्लादेश सरकारने रोहिंग्यांच्या छावण्यांमधून कंडोमचं वाटप केलं होतं. पण रोहिंग्यांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अशातच रोहिंग्यांमध्ये बहुपत्नित्वाची प्रथा असल्याने त्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. या वाढीव लोकसंख्येला अन्न पुरवठा करता करता बांग्लादेश सरकारची चांगलीच दमछाक होतेय. म्हणूनच धास्तावलेल्या बांग्लादेश सरकारने रोहिंग्या पुरुषांची थेट नसबंदी करण्याचाच निर्णय घेतलाय. अर्थात बांग्लादेश सरकारच्या या निर्णयावर काही मानवधिकार संघटनांकडून टीका होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

मान्यमारमध्ये रोहिंगे आणि भूमिपूत्र बौद्ध धर्मियांमध्ये मोठा संघर्ष पेटलाय. वाढत्या हल्ल्यांमुळे रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेतलाय. पण बांग्लादेशमध्येही रोहिंग्यांना आश्रय देण्यास विरोध वाढू लागलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2017 06:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...