घोडा किंवा गाढव नाही तर चक्क रोबोटवर चालली रिक्षा, VIDEO पाहून युझर्स म्हणाले...

घोडा किंवा गाढव नाही तर चक्क रोबोटवर चालली रिक्षा, VIDEO पाहून युझर्स म्हणाले...

टांग्यासारखं दिसणारी ही रिक्षा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता रोबोट चालवत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : पूर्वीच्या काळी घोडागाडी किंवा गाढव घेऊन काही ठिकाणी खास प्रजातीचे श्वान गाडी ओढण्यासाठी तयार केले जात होते. बदलत्या काळानुसार या गोष्टी मागे पडल्या आणि चारचाकी गाड्या पेट्रोल-डिझेल CNG वर चालणाऱ्या गाड्या आल्या. बदलत्या काळानुसार आता रोबोट देखील हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रात येत आहेत. कोरोना काळात रुग्णालयात मदत करण्यासाठी एकीकडे रोबोट तयार केले जात असतानाचा टांगा चालवण्यासाठी देखील रोबोटचा वापर केला जात असल्याचा एका व्हिडीओ समोर आला आहे.

टांग्यासारखं दिसणारी ही रिक्षा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता रोबोट चालवत आहे. या रोबोटच्या मदतीनं रिक्षा चालताना दिसत आहे. अनेक युझर्सनी ही भविष्यातली रिक्षा असाही उल्लेख केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याला रोबोट रिक्षा असंही म्हटलं आहे.

हे वाचा-'Dirty अरब' म्हणत मुस्लिम 2 महिलांवर चाकूहल्ला! क्षुल्लक कारणावरून केले 6 वार

हा व्हिडीओ फेब्रुवारीमधील असल्याची माहिती मिळाली आहे. 64 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 700 हून अधिक लोकांनी हा रिट्वीट केला आहे तर 66 लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या रिक्षा दिसू शकतात असंही काही युझर्स म्हणाले आहेत. तर काही युझर्सनी याची तुलना कारच्या किंमतीसोबत देखील केली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 22, 2020, 12:27 PM IST

ताज्या बातम्या